आयपीएल फायनलसाठी बेटिंग घेणारे ताब्यात; संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Betting takers for IPL finals in custody; The suspect is from Kolhapur district

आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी बेटिंगचा जुगार घेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतले.

आयपीएल फायनलसाठी बेटिंग घेणारे ताब्यात; संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील 

सांगली : आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी बेटिंगचा जुगार घेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतले. नितीन सुरेश ओसवाल (वय 43, रा. दुधाळी पॅव्हेलियन, कोल्हापूर) व आनंदा गजानन गडकर (वय 35, रा. गवत मंडई, उत्तरेश्‍वर पेठ, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून बेटिंगच्या साहित्यासह मोबाईल, चारचाकी असा एकूण 3 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सांगली-इस्लामपूर रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. 


अधिक माहिती अशी, की मुंबई इंडियन आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात मंगळवारी आयपीएलचा अंतिम सामना खेळविण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर बेटिंग होण्याची शक्‍यता असल्याने त्यांच्यावर नजर ठेवून कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पथक इस्लामपूर विभागात गस्तीवर होते.

त्यावेळी इस्लामपूर-सांगली रस्त्यावर नितीन ओसवाल चारचाकी गाडीतून (एमएच 10 बीए 4314) फिरून बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला. नितीन ओसवाल व त्याचा साथीदार आनंदा गडकर हे दोघेही बेटिंग घेताना रंगेहात मिळून आले. त्यांच्याकडील स्कोअर कागद, चार मोबाईल आणि चारचाकी असा एकूण तीन लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक अभिजित सावंत, संदीप गळवे, संदीप नलवडे यांनी कारवाई केली. 

मालक नागपूर येथील 
दोघा संशयितांकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, नागपूर येथील मित्तलनामक व्यक्ती मालक असल्याचे समोर आले. त्या अनुषंगाने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

संपादन : युवराज यादव

loading image
go to top