कबुतर पाळताय...साठ आजारांपासून सावध रहा

Beware of sixty disease due to  Pigeons
Beware of sixty disease due to Pigeons
Updated on

इस्लामपूर : कबुतर पाळताय...सावधान. कारण त्याच्यापासून मानवी आरोग्याला विविध आजारांचा धोका आहे. मानव व कबुतरांचे जवळचे नाते आहे. कबुतर हवेहवेसे वाटते. त्यांना पाळणे, खायला घालणे, लाड करणे, सर्वांना आवडते. मात्र असे करत असाल तर सावधान. या कबुतरांमुळे फुप्फुसाचे विकार व ऍलर्जीची बाधा होत आहे. दम व श्वसनाच्या इतर व्याधी पाठीशी लागण्याबरोब फुप्फुस निकामी होण्याचाही धोका आहे.

कबुतर तसा निष्पाप पक्षी. घराच्या खिडक्‍या, पोटमाळे, घरावरील पत्रे, मोकळे मैदान, पडके वाडे, इमारतीच्या गच्चा या ठिकाणी त्यांचे वास्तव्य असते. त्याचे पंख व विष्ठेमुळे मानवाला विविध विकार जडतात असे समोर आल्याने त्याबाबत जागृती होणे गरजेचे आहे.

आपल्या परिसरात अनेक पक्षीप्रेमी पुण्य कर्म म्हणून कबुतरांना नित्यनेमाने खायला घालतात. अनेक गावे, शहरात कबुतर पाळण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र अनेक ठिकाणी अनेकांना गंभीर आजाराना सामोरे जावे लागले आहे.  चार वर्षांपूर्वी कबुतरांना खायला घालण्याच्या सवयीमुळे एका सुशिक्षित तरुणीचे फुप्फुस निकामी झाल्याचे समोर आले. 

एका संशोधनानुसार कबुतरांची विष्ठा आणि पिसे(पीजन ड्रॉपिंग्ज)या मध्ये बुरशी अर्थात आयस्परजीला फंग्स आढळून आलेत. त्यांच्या संपर्कात आल्याने ऍलर्जी होते. हायपरसेन्सिटीव्ह नुमोनाईट्‌सहिा फुफ्फुसाचा आजार होतो. फुफ्फुसात शवसनाद्वारे ऑक्‍सिजन घेणाऱ्या वायूकोषाबाहेरील आवरणाला सूज येते. त्यामुळे वायूकोषात ऑक्‍सिजन घेण्याचे प्रमाण कमी होऊन दम लागायला लागतो. 

विष्टेमुळे साठ प्रकारचे आजार 

कबुतरांच्या विष्टेमुळे मनुष्याला दमा, ऍलर्जी, खोकला, धाप लागणे, शवसनाशी संबंधित साठ प्रकारच्या आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे संशोधनात समोर आले आहे. कबुतरांच्या पासून 100 मीटर परिघातील व्यक्तींना त्रास होतो. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या ऍलर्जीबाबतचे संशोधन इंडियन जर्नल ऑफ ईमुनोलॉजी अँड रेस्पिरेटरी मेडिसीनमध्ये प्रकाशित झाले आहे. 

काबूतरांपासून होणारे आजार 

  • हायपरसेनसिव्हिटी नुमोनाईट्‌स . 
  • कोरडा खोकला,दम लागणे ,ताप येणे.दमा. 
  • लवकर उपचार न घेतल्यास फुफ्फुस निकामी होण्याचा धोका आहे. 

स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे

कबुतरांच्या विष्ठेत जंतू असतात. ते फुफ्फुसाच्या आवरणाला सूज निर्माण करतात. फुफुस वगळता इतर अवयवांना धोका नाही. कबुतरांच्या सानिध्यात आल्यानंतर लॉंगफायबरोसिस आजार होतो. हा पक्षी काही रोगांचे वहन करतो. कबुतरांची राहण्याची ठिकाणे नेहमी स्वच्छ असावीत. त्याच्या संपर्कात येणाऱ्यांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे.

- डॉ. संजय पवार, पशुधन विकास अधिकारी, इस्लामपूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com