esakal | योगी आदित्यनाथ मठात गेले अन् मुख्यमंत्री झाले, संजयकाकांना पण कुणीतरी न्या?
sakal

बोलून बातमी शोधा

'योगी आदित्यनाथ मठात गेले अन् मुख्यमंत्री झाले'

'योगी आदित्यनाथ मठात गेले अन् मुख्यमंत्री झाले'

sakal_logo
By
विष्णू मोहिते - सकाळ वृत्तसेवा

सांगली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खासदार संजयकाका पाटील यांनी किल्ले मच्छिंद्रगडच्या मठात नेले आणि ते मुख्यमंत्री झाले. संजयकाकांनी मला त्याच मठात नेले आणि मी केंद्रात मंत्री झालो. आता खासदार संजयकाकांनाही कुणीतरी त्या मठात न्यावे, त्यांना मंत्री होण्याचा योग यावा, असा सल्ला केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी आज दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या उपस्थितीत ही राजकीय जुगलबंदी रंगली.

येथील सांगलीवाडी लक्ष्मी फाट्यावर अभिनेत्री दिपाली सय्यद फौंडेशनतर्फे आयोजित पूरग्रस्त कुटुंबियांना धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील आदी उपस्थित होते. खासदार संजय पाटील हे भाजपचे आहेत.

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराच विषय आला की त्यांच्या नावाची नेहमी चर्चा होते, मात्र त्यांना आतापर्यंत संधी मिळालेली नाही. तो धागा पकडत कपील पाटील यांनी संजयकाकांसाठी मठाचा रस्ता कुणीतरी धरा, असा सल्ला दिला.

हेही वाचा: कोल्हापूर : दहा जणांनी पाठलाग करून सातवेच्या शिवतेजचा घोटला गळा

काही वर्षांपूर्वी योगी आदित्यनाथ हे आमदार व्हायच्या आधी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी संजयकाका पाटील यांनी त्यांना किल्लेमच्छिंद्रगडच्या मठात नेले होते. स्वतः कपील पाटील यांनीही खासदार तेथे घेऊन गेले होते. या दोघांचे नशीब सध्या जोरात आहेत. संजयकाका खासदार आहेत, मात्र त्यापेक्षा मोठ्या पदाचा रस्ता मठातूनच जातो, असा सल्ला कपील पाटील यांनी त्यांना दिला.

loading image
go to top