कोल्हापूर : दहा जणांनी पाठलाग करून सातवेच्या शिवतेजचा घोटला गळा

शिवतेज घाटगे
शिवतेज घाटगेsakal

कोल्हापूर : प्रेम प्रकरणाच्या कारणातून सातवे (Satve) ( ता. पन्हाळा) येथील महाविद्यालयीन तरुणाचा बेदम मारहाण केली. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. शिवतेज उर्फ मोन्या विनायक घाटगे (Shivtej Ghatge)(वय१८) असे त्याचे मृतांचे नाव आहे. मारेकऱ्यांवर तातडीने खुनाचा गुन्हा नोंद करून अटक करा. त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. त्यामुळे सीपीआर शवविच्छेदन विभाग परिसरात तणाव निर्माण झाला.

याबाबत पोलिस आणि नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी की,

शिवतेज घाटगे याचे एका मुलीवर प्रेम होते. या वरून मुलीच्या नातेवाईकांचा आणि त्याचा यापूर्वी वाद झाला होता. तो बुधवारी सायंकाळी मोटारीतून म्हैस सोडण्यासाठी सातवे ते कांदे मार्गावर गेला होता. त्यावेळी आठ ते दहा जणांनी पाठलाग करून त्याचा टेम्पो अडवला. त्याला काठीने बेदम मारहाण केली. तेथे परिसरातील नागरिक जमा झाले. तसे हल्लेखोरांनी त्याला दुसरीकडे नेऊन विवस्त्र करत मारहाण केली. म्हैस मालकांने हा प्रकार त्यांच्या नातेवाईकांना फोन करून सांगितला.

नातेवाईकानी मांगले भागातील घटनास्थळी धाव घेऊन जखमी शिवतेजला कोडोली पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्याला प्रथम उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तो चालत आणि बोलत होता. रात्री वैद्यकीय तपासणीसाठी त्याला कोल्हापुरात आणले. पण मध्यरात्री त्याची प्रकृती अधिकच खालावली. पुढील उपचारासाठी त्याला सीपीआर रुग्णालयात हलवले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

शिवतेज घाटगे
मिरजेची सभापतीपदाची हॅटट्रिक: BJP च्या आवटींनी मारली बाजी

घडलेल्या प्रकाराची कोडोली पोलीस ठाण्याने गांभीर्याने दखल घेतली नाही. मारेकऱ्यांवर खूनाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना तात्काळ अटक करा. त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका घेतली. शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सीपीआरला भेट दिली. त्याआधी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com