esakal | 'मी आलो अन् महापूर यायला लागले, असे समजून घेऊ नका' - राज्यपाल कोश्यारी
sakal

बोलून बातमी शोधा

governor bhagat singh koshyari speech pune insist for marathi

केंद्र व राज्याच्या महापूर मदतीच्या योजना येथे प्रभावीपणे राबवा आणि लोकांना दिलासा द्या.

'मी आलो अन् महापूर यायला लागले, असे समजून घेऊ नका'

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : मी राज्यात राज्यपाल म्हणून आल्यानंतर इथे आपत्ती वाढल्या आहेत. महापूर येत आहेत. मी उत्तराखंडहून आलो. त्या भागात महापूर नेहमीचाच आहे. त्यामुळे मी येताना महापूर घेऊन आलोय आणि मी गेल्याशिवाय महापूर थांबणार नाही, असे तुम्ही समजून नका, असे विधान आज राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केले. येथील एका खासगी समारंभात ते बोलत होते. पालकमंत्री जयंत पाटील, केंद्रीय मंत्री कपील पाटील, खासदार संजय पाटील आणि अभिनेत्री दिपाली सय्यद आदी व्यासपीठावर होते.

हेही वाचा: 'योगी आदित्यनाथ मठात गेले अन् मुख्यमंत्री झाले'

कोश्‍यारी म्हणाले, 'मी केदारनाथहून आलो आहे. महापुरात तेथे पाच हजार लोकांच्या मालमत्तेची हानी झाली होती. आमच्याकडचा महापूर भयंकर असतो. त्याला धैर्याने तोंड द्यावे लागते. इथेही महापुराने नुकसान झाले आहे. केंद्र व राज्याच्या महापूर मदतीच्या योजना येथे प्रभावीपणे राबवा आणि लोकांना दिलासा द्या. यावेळी त्यांनी अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे कौतुक केले. दिपाली सय्यद फौंडेशनतर्फे यावेळी दोनशे मुलींना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या ठेव पावत्यांचे वितरण केले. राजकारणात पराभूत झाल्यानंतर लोक थांबतात, मात्र दिपाली यांनी चांगले काम सुरु ठेवले आहे. त्या अशाच काम करत राहिल्या तर राजकारणताही नक्कीच यशस्वी होतील, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.

loading image
go to top