भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी मोठी चुरस

प्रशांत चवरे
बुधवार, 30 मे 2018

भिगवण - येथील भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमाताई पद्माकर माडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे सुपर्द केला. ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठ महिला सदस्यापैकी बहुतेक सदस्या सरपंच पदासाठी इच्छुक असल्यामुळे येथील सरपंच पदासाठी सध्या मोठी चुरस आहे. सरपंच पदाच्या या शर्यतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

भिगवण - येथील भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमाताई पद्माकर माडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे सुपर्द केला. ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठ महिला सदस्यापैकी बहुतेक सदस्या सरपंच पदासाठी इच्छुक असल्यामुळे येथील सरपंच पदासाठी सध्या मोठी चुरस आहे. सरपंच पदाच्या या शर्यतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अडीच वर्षापुर्वी झालेल्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 17 पैकी 13 जागा जिंकत सत्ता हस्तगत केली होती. सरपंच हेमाताई माडगे तर उपसरपंच प्रदीप वाकसे यांचे नेतृत्वाखाली अडीच वर्षाचा कार्यकाल नुकताच पुर्ण केला आहे. त्यानंतर सरपंच हेमाताई माडगे यांनी पक्षश्रेष्ठीकडे राजीनामा दिला तर उपसरपंच प्रदीप वाकसे यांचा राजीनामा मासिक बैठकीमध्ये मंजुर करण्यात आला आहे. गुरुवारी(ता.31) रोजी उपसरपंच पदासाठी निवडणुक होत आहे. उपसरपंचाच्या निवडीनंतर सरपंच पदाचा राजीनामा पंचायत समितीकडे सादर करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सरपंच पदासाठी इच्छुक असलेले सर्वच उमेदवार आक्रमक असल्यामुळे सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीकडुन हेमाताई माडगे, वंदना शेलार, अनिता धवडे, रेखा पाचांगणे, अश्विनी शेंडगे, लता चोपडे, ललिता जाडकर, अरुणा धव़डे या आठ महिला ग्रामपंचायत सदस्या निवडुन आल्या होत्या. त्यापैकी हेमाताई माडगे यांनी सरपंच पदाचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. सरपंच पदासाठी अनिता धवडे, अश्विनी शेंडगे, लता चोपडे, वंदना शेलार, अरुणा धव़डे या महिला सदस्यांमध्ये स्पर्धा आहे. तर अडीच वर्षामध्ये सरपंच हेमाताई माडगे यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामामुळे त्यानांच कायम ठेवावे असाही एक मतप्रवाह आहे. सरपंच पदासाठी इच्छिकांची संख्या वाढल्यामुळे एकमत घडवुन आणणे हे पक्षाच्या दृष्टीने मोठी डोकेदुःखी ठरली आहे. सरपंच पदाबाबत कोणाच्या नाववर एकमत होते व कोणाच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडते याबाबत उत्सुकता आहे.    
अडीच वर्षात पाच सरपंच पाच उपसरपंच  
सरपंच पदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे व सदस्यांची नाराजी टाळण्यासाठी सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या पाचही सदस्यांना सहा महिन्यांसाठी सरपंचपद तर उर्वरीत पाच सदस्यांना उपसरपंच पद देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचीही चर्चा आहे. त्यातही इच्छुकांना पहिल्यांदा सरपंचपद हवे असल्यामुळे अडचणी आहेत. पाच सरपंच व पाच उपसरपंच हा प्रस्ताव मान्य झाल्यास इच्छुक सदस्यांची नाराजी दुर होईल पण विकासाचे काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: bhigwan gram panchayat elections