पोटासाठी चूल रस्त्यावरच पेटवावी लागली

Food
Food

बेगमपूर - 'फोटो खिंचवाकर क्या करोगे साहब, घर का चुला सुलगाने के लिये ये तो करना ही पडेगा' ही भावनिक प्रतिक्रिया आहे भीमेच्या पुरामुळे दोन दिवसापासून बेगमपूर (ता. मोहोळ) येथे थांबलेल्या वाहनचालकांची.

भीमेच्या महापुरामुळे बेगमपूर माचनुर दरम्यान भीमा नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने मागील दोन दिवसापासून मार्गावरील वाहतूक बंद आहे. अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी आहेत. कुटूंबियांच्या रोजी रोटीसाठी माल वाहतुक व्यवसायाच्या निमित्ताने वाहन घेऊन निघालेल्या वाहनचालकांपुढे ही अनेक समस्या आहेत. दरम्यान आज पोटाचा (जेवण) प्रश्न सोडवण्यासाठी मात्र भर रस्त्यावरच चूल (गॅस) पेटवावी लागली. या घटनेचे फोटो घेत असतानाच चालकांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रसंग छोटासाच पण बरेच काही सांगून गेल्याचे जाणवले.

पुराच्या पाण्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन, वाहून गेलेली शेतातील पिके यामुळे हवालदिल झालेला शेतकरी वर्ग अन वाहन भाड्यातून दोन पैसे उत्पन्न मिळवणाऱ्या वाहनधारकावर ओढवलेला हा प्रसंग.

एकूणच पुराच्या पाण्याने सर्वानाचं  अडचणीत आणल्याचे चित्र आहे. वाहनात माल असल्याने त्याची सुरक्षितता म्हणून वाहने सोडून त्यांना अन्यत्र  जाता येत नाही. त्यामुळे जेवणाचा पर्यायाने भुकेमुळे निर्माण होणाऱ्या पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी आज (ता. ९) सकाळीच बेगमपूर येथील इंदिरानगर चौकातील रस्त्यावर परराज्यातील वाहनधारकांने पोटासाठी उघडयावर मांडलेल्या चूलीवर स्वयंपाकाची तयारी सुरू केली होती.

एकंदरीत वाहनचालकांच्या आयुष्यातील हा प्रसंग उपस्थिताना बरंच काही सांगून गेल्याचे जाणवले. सध्या पुराच्या पाण्याची पातळी कमी होत आहे, आज उद्या वाहतुकीसाठी पूल ही खुला होईल परंतु घरची चूल पेटविण्याकरिता वाहन चालकांना स्वतःची चूल मात्र प्रसंगाच्या अनुषंगाने रस्त्यावरच पेटवावी लागते, हे सत्य मात्र आज अनेकांना पहावयास मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com