नगरकरांसाठी मोठी बातमी ः 196 जणांचे रिपोर्ट आले "निगेटीव्ह' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) 200 व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील 196 जणांचे अहवाल "निगेटीव्ह' आले आहेत.

नगर ः जिल्ह्यात आतापर्यंत 261 जणांची कोरोना संदर्भात तपासणी करण्यात आली आहे. त्यातील आणखी तिघांना जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले आहे. तर 256 व्यक्तींना घरीच देखरेखीखाली ठेवल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.

पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) 200 व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील 196 जणांचे अहवाल "निगेटीव्ह' आले आहेत. सध्या दोघांचे अहवाल बाकी आहेत. तर दोघे यापूर्वीच कोरोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे.

परदेशातून आलेल्या लोकांमुळे जिल्ह्यात ही कोरोनाबाणी स्थिती निर्माण झाली आहे. पुणे, मंबईसह लोकांच्या जथ्थेच्या जथ्थे गावाकडे परतत आहेत. आलेल्या लोकांनाही गावकरी स्वीकारायला तयार नाहीत. त्यांच्यापासून फटकूनच राहत आहेत. त्यामुळे परदेशातून आलेल्या तसेच शहरी बाबूंना वाळीत टाकल्यासारखे वाटत आहे. 

आतापर्यंत जे लोक परदेशातून आले आहेत. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाचा वॉच आहे. जे लोक स्वतःहून होम क्वॉरंटाईन होत नाही, त्यांना जबरदस्तीने धरून आणले जात आहे. दुबईहून आलेल्या लोकांमुळे संसर्ग झाला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांपासून संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे लोकांनी तसेच नातेवाईकांनी त्यांच्यापासून दूर रहावे, असं आवाहन केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big news for Nagarikar196 people report negative

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: