कवठेमहांकाळ : येथील पोलिसांनी दुचाकी चोरीचा छडा लावला. पोलिसांनी दुचाकी चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणले. पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सहा लाख ४५ हजार रुपये किमतीच्या नऊ दुचाकींसह एका संशयितास ताब्यात घेतले. ज्ञानू अण्णाप्पा खोत (कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ) असे संशयितांचे नाव आहे. अन्य दोघेजण पसार आहेत. दुचाकी चोरीप्रकरणी तिघांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.