

Legacy of Equality: Following the Path of Jyotirao Phule and Dr. B.R. Ambedkar in Everyday Life
Sakal
सांगली : वाचक रुढी-परंपरांना नाकारण्यासाठी माहात्मा फुले यांनी 'सार्वजनिक सत्य धर्म' स्थापन केला. महात्मा फुले आणि त्यांना गुरुस्थानी ठेवत बहुजन, अस्पृश्यांमध्ये क्रांतीची ज्योत पेटवणारे डॉ. बाबासाहेब अविडकर यांनी केलेल्या 'मनुस्मृती दहन दिवस' २५ डिसेंबरचे निमित्त साधत विसूरमधील ग्रामस्थांनी दहा वर्षांपूर्वी अनेक जाचक प्रधांना फाटा द्यायचा निर्णय केला. त्यापैकीच एक म्हणजे 'सुतक मुक्ती दिवस.' गत्त दहा वर्षात दरवर्षी ३०-३५ कुटुंबे या पद्धतीने व्यक्तीच्या मृत्यूनंतरचे सुतक तीन दिवसांत संपवून नंतरचे विधी सत्यशोधक पद्धतीने करतात. यानिमित्ताने ही कुटुंबे महात्मा फुले यांचे विचार जगण्यात आणतात.