पालिकेला कोरोना निधीबाबत राज्य सरकारकडून दुजाभाव : भाजपचा आरोप

जयसिंग कुंभार 
Tuesday, 4 August 2020

सांगली-  राज्य सरकारने महापालिकेत विरोधी सत्ता असल्याने कोरोना नियंत्रणासाठी निधीबाबत दुजाभाव केला आहे असा आरोप आज भाजपच्यावतीने करण्यात आला. महापौर गीता सूतार, गटनेते युवराज बावडेकर, उपमहापौर आनंदा देवमाने, स्थायी समिती सभापती संदीप आवटी, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी उपमहापौर, गजानन मगदूम, निरंजन आवटी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आज कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्या आरोपांवर प्रतिहल्ला केला.

सांगली-  राज्य सरकारने महापालिकेत विरोधी सत्ता असल्याने कोरोना नियंत्रणासाठी निधीबाबत दुजाभाव केला आहे असा आरोप आज भाजपच्यावतीने करण्यात आला. महापौर गीता सूतार, गटनेते युवराज बावडेकर, उपमहापौर आनंदा देवमाने, स्थायी समिती सभापती संदीप आवटी, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी उपमहापौर, गजानन मगदूम, निरंजन आवटी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आज कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्या आरोपांवर प्रतिहल्ला केला. श्री साखळकर राजकीय स्टंटबाजी करीत असल्याचा त्यांनी आरोप केला. 

श्री बावडेकर म्हणाले,"" कोरोना रोखण्यात भाजप नव्हे तर महाराष्ट्रातील तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकारच अपयशी ठरले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोबिवली, भिवंडी, वसई विरार येथील महापालिकांना मोठा कोरोना निधी दिला आहे. त्यावर साखळकर यांनी बोलावे. खासगी हॉस्पिटलमधील उपचाराचे जादा दर भाजपने नव्हे तर महाविकास आघाडीने ठरवले आहेत. ते कमी करावेत यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. '' 

श्री बावडेकर म्हणाले,"" चंद्रकांतदादा पाटील महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांची या महापालिकेच्या कारभारावर बारीक नजर आहे. अशा बऱ्याच महापालिकांवर त्यांचे लक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यावर बोलून स्टंट करण्यापेक्षा स्व:ताच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत त्याकडे जरा लक्ष द्यावे.'' 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP alleges damage to Corona fund from state government