esakal | बेळगाव लोकसभा: भाजपच्या मंगला अंगडी आघाडीवर तर काँग्रेसचे जारकीहोळी पिछाडीवर

बोलून बातमी शोधा

null
बेळगाव लोकसभा: भाजपच्या मंगला अंगडी आघाडीवर तर काँग्रेसचे जारकीहोळी पिछाडीवर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार मंगला अंगडी सुमारे 2 हजार मताधिक्याने आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीत अंगडी यांनी आघाडी घेतली आहे. अंगडी यांना 54508 मते पडली असून, जारकीहोळी यांना 51443 मतदान झाले असून सुमते 2 हजार मताधिक्यानी ते आघाडीवर आहेत. दरम्यान शुभम शेळके यांना 16571 मते पडली आहेत.

बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी 17 एप्रिलला चुरशीने झाले. त्यानंतर निवडणुकीत कोण विजय होणार याकडे गेल्या दोन आठवड्यापासून लक्ष लागून होते. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात काँग्रेसचे उमेदवार यांना 7584 मते पहिल्या फेरीत पडली असून ते आघाडीवर असल्याचे होते.

प्रतिस्पर्धी उमेदवार भाजप अंगडी यांना 4230 मतदान झाले होते. सुमारे साडेतीन हजार मताधिक्यानी ते आघाडीवर होते. पहिल्या फेरीत पोस्टल मतदान मतमोजणी करण्यात आली आहे.

Edited By- Archana Banage