अविश्वसनीय ! ; सर्वसामान्याची प्रतिक्रिया (video)

अशोक मुरुमकर
Saturday, 23 November 2019

राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यापासून अनेक अनपेक्षीत राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शनिवारी सकाळी फडणवीस यांनीही अनपेक्षीतपणे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली यावर अनेकांचा उशीरापर्यंत विश्वास बसत नव्हता.

सोलापूर : भाजपने राज्यात शनिवारी (ता. २३) सरकार स्थापन करुन सर्वसामान्यांसह राजकीय विश्लेषकांना अविश्वसनिय धक्का दिला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस झाले आहेत यावर विश्वास बसत नसल्याचे सांगत सकाळपासून फक्त 'पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र कसे?' हाच प्रश्न केला जात आहे.

राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यापासून अनेक अनपेक्षीत राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शनिवारी सकाळी फडणवीस यांनीही अनपेक्षीतपणे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली यावर अनेकांचा उशीरापर्यंत विश्वास बसत नव्हता. शुक्रवारी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांची एकत्रीत बैठक झाली. आणि महाविकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चीत झाले होते. शनिवारी याबाबत काय होणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली होती..रात्री उशीरापर्यंत अनेकानी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे मानले होते. यांच्या मंत्री मंडळाची वाटाघाटी सुद्धा अनेकांनी अंदाज बांधत करुन टाकली होती. मात्र शनिवारी सकाळी सर्वांनाच अविश्वसनिय धक्का बसला. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी भाजपला का पाठिंबा दिला असेल यावर तर्कवितर्क लावले जात आहेत.

याबाबत प्रविण घोडके म्हणाला, महाराष्ट्रात राष्ट्रवादी फोडण्यात भाजपला यश आले आहे. भाजपची यावेळी खेळी यशस्वी झाली आहे. माऊली वाकळे म्हणाले, अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे. शरद पवारी यांनी खूप कष्ट घेऊन राष्ट्रवादी वाढवली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी विचार करुन निर्णय घेईला हवा होता. याचा परिणाम काय होईल माहित नाही पण, हा प्रकार नक्कीच धक्कादायक आहे.

सोमनाथ पवार म्हणाले, यात शिवसेनेचे नुकसान झाले आहे. शरद पवार यांचीच ही खेळी असू शकते. पाच वर्ष हे सरकार टीकेल असं मला वाटत नाही. शहारुख शेख म्हणाले, भाजपने रात्रीत खेळी केली आहे. पण हे सरकार बरोबर नाही. पाच वर्ष हे सरकार चालणार नाही.
-
संजय शिंदे यांची चर्चा
विधानसभा निवडणूकीत करमाळा मतदारसंघात अपक्ष म्हणून संजय शिंदे निवडणूकीच्या रिंगणात होते. राष्ट्रवादीने संजय घाटणेकर यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा शिंदे यांना असल्याचे जाहीर केले होते. निकाल झाल्यानंतर शिंदेहे विजयी झाले. काही दिवसातच त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येण्याचे निश्चीत झाले होते. मात्र आता भाजपचे सरकार आल्याने शिंदे चर्चेत आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp cm