पलूस नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढवणार

आगामी पलूस नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढवणार असून पलूस-कडेगाव विधानसभेचे भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख हेच असतील यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSakal

पलूस - आगामी पलूस नगरपालिकेसह (Palus Municipality) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) भाजपा (BJP) स्वबळावर लढवणार असून पलूस-कडेगाव विधानसभेचे भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख (Sangramsinh Deshmukh) हेच असतील यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील (Chadrakantdada Patil) यांनी पलूस येथे बोलताना सांगितले. ते पलूस तालुका भारतीय जनता पक्षाच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी चंद्रकांत दादा पुढे म्हणाले की 2019 च्या महापुरात देवेंद्र फडणवीस सरकारने पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत केली असून आताच्या आघाडी सरकारने 2021 मधील महापूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवणसाठी भाजपाने पलूस मध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरूपी कार्यालय हवे म्हणून पलूस मध्ये नूतन कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

Chandrakant Patil
राजू शेट्टींना चंद्रकांतदादांची ऑफर

2019 मध्ये पलूस कडेगाव हा मतदारसंघ शिवसेनेला गेल्यामुळे विश्वजीत कदम विजयी झाले. सांगली जिल्ह्यामध्ये आमच्याकडून दोन चुका झाल्या त्या म्हणजे वाळवा मतदार संघ व पलूस-कडेगाव मतदारसंघ शिवसेनेला दिला.

नाहीतर जयंतराव पाटील व विश्वजीत कदम घरी बसले असते आता आपल्याकडे तीन वर्षे आहेत पलूस-कडेगाव मतदार संघातून भाजप मोठ्या ताकतीने निवडणूक लढवणार असून संग्राम देशमुख हेच उमेदवार असतील त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न हे आघाडी सरकार सोडवु शकत नाही तो प्रश्न फक्त भाजपच सोडवु शकते असेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख मकरंद देशपांडे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, भाजपने अडचणीतल्या माणसांना बाहेर काढले महापुरात मोठी मदत केली. आज या ठिकाणी एक रुपयाही माणसांना मिळालेला नाही पदवीधर निवडणुकीत डरपोक मतदार वाढल्यामुळे आमचा पराभव झाला.

आम्ही शांतपणे घेतो याचा अर्थ आम्ही थांबलेलो नाही. आम्ही एकदा पुढे आलो कि मागे ही बघणार नाही. यावेळी जि.प. माजीअध्यक्ष संग्रामसिंह देशमुख म्हणाले, भाजपने 2019 च्या महापूरात भरभरून मदत केली.

Chandrakant Patil
खासदार संजय पाटील आले, फक्त हजेरी लावून निघून गेले

शाश्वत विश्वास टाकावा असा माणूस या आघाडी सरकार मध्ये नाही. भाजप हिच सर्वसामान्य माणसांची पार्टी, आहे सर्वसामान्यांना मदत करणारी, सर्वसामान्याला उभा करणारी पार्टी आहे. राज्य सरकारने काही नाही दिले तरी भाजप प्रतिसरकार म्हणून आपल्या मदतीसाठी उभा राहील. या कार्यक्रमात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला चंद्रकांत दादा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पलूस शहर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षपदी रोहित पटेल यांची निवड करण्यात आली. व दादांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक पलुस तालुका भाजपचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले. कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती दीपक मोहिते माजी सभापती सीमा मांगलेकर पं. स. सदस्य रामचंद्र वरुडे डॉ. सागर सूर्यवंशी सुरेंद्र चौगुले सूर्यकांत बुचडे चंद्रकांत फाळके रामानंद पाटील जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई पाटील श्रीरंग पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com