राजू शेट्टींना चंद्रकांतदादांची ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raju shetti

राजू शेट्टींना चंद्रकांतदादांची ऑफर

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांचा ‘वारं’ आणि ‘आग’ असा उल्लेख करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना ऑफरच दिली आहे. शेट्टींना भाजपसोबत यायचे असेल आणि त्यांचा तसा प्रस्ताव आला तर भाजपची नऊ जणांची समिती त्यावर चर्चा करेल, असे त्यांनी आज पत्रकार परिषदेत एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. (Sangali News)

राजू शेट्टी यांनी सध्या महापुराच्या प्रश्‍नावर रान उठवले आहे. कोल्हापूर येथे भव्य मोर्चा काढल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गडात इस्लामपुरातही मोर्चा काढला. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आता ते महाविकास आघाडीला अंगावर घेत आहेत. त्यामुळे ते भाजपच्या जवळ जात आहे का? अशीही चर्चा आहे. त्यांच्या मोर्चाला भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा: राणे विरुद्ध शिवसेना; रमेश मोरेची हत्या का झाली?

नेमका हा धागा पकडत विचारलेल्या प्रश्‍नावर चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांना गोंजारण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘‘राजू शेट्टी हे वारं आहे आणि आगही आहे. ते कुणाच्या हातात सापडत नाहीत. ते आमच्याकडे होते तेव्हाही सरकारच्या विरोधात आक्रमकपणे बोलायचे. ते तिकडे गेले. महाविकास आघाडीला वाटले, ते आपण म्हणू तसे ऐकतील. त्यांना राजू शेट्टी कळाले नाहीत. जिथे चुकीचे घडते तिथे ते बोलतात. त्यांना भाजपसोबत यायचे असेल, तर तसा प्रस्ताव आल्यावर भाजपची नऊ जणांची समिती आहे, ती त्यावर चर्चा करून निर्णय घेईल.’’

Web Title: Chandrakantdadas Offer To Raju Shetty

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top