भाजपने दिली "या' चेहऱ्यांना पुन्हा संधी 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 15 जानेवारी 2020

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या तालुकाध्यक्ष व मंडलाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची कर्मभूमी असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्‍यात व ते प्रतिनिधित्व करत असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्‍यात नव्या तालुकाध्यक्षांची निवड केली आहे. तालुकाध्यक्षांच्या निवडी जरी नव्याने झाल्या असल्या तरी पुन्हा जुन्याच चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी घेतली आहे. 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या तालुकाध्यक्ष व मंडलाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची कर्मभूमी असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्‍यात व ते प्रतिनिधित्व करत असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्‍यात नव्या तालुकाध्यक्षांची निवड केली आहे. तालुकाध्यक्षांच्या निवडी जरी नव्याने झाल्या असल्या तरी पुन्हा जुन्याच चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी घेतली आहे. 

हेही वाचा ः सिद्धेश्‍वर यात्रेत आज काय झाले विधी 

उत्तर सोलापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी मार्डी येथील काशिनाथ कदम यांची फेरनिवड करण्यात आली. तालुका सरचिटणीसपदी पाथरी येथील श्रीमंत बंडगर यांची निवड केली आहे. दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्षपदी पुन्हा नव्याने पंचायत समितीचे उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी निवड केली आहे. यापूर्वीही त्यांच्याकडेच भाजपचे तालुकाध्यक्षपद होते. नुकतेच त्यांची पंचायत समितीच्या उपसभापतिपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर दोन पदांची जबाबदारी माजीमंत्री देशमुख यांनी दिली आहे. तालुका सरचिटणीस पदाची जबाबदारी सुनील कळके यांच्यावर सोपविली आहे. 

हेही वाचा ः शिवसेनेचे ठरलं...आता बुथनिहाय शाखाप्रमुख अन्‌ जिल्हाप्रमुखनिहाय संपर्कप्रमुख 

उत्तर सोलापूर व मोहोळ या दोन तालुक्‍यातील तालुकाध्यक्ष व सरचिटणीस यांच्या निवडी 14 जानेवारीला झाल्या. मोहोळ तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा सतीश काळे यांच्याकडे देण्यात आली आहे. उत्तर, दक्षिण, मोहोळ व अक्कलकोट या तीन तालुक्‍यांच्या पदाधिकारी निवडीत माजीमंत्री देशमुख व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे वर्चस्व राहण्याची शक्‍यता आहे. 16 जानेवारीला अक्कलकोट तालुका व अक्कलकोट शहराच्या निवडी होणार आहेत. त्यामध्ये आमदार कल्याणशेट्टी यांचे वर्चस्व राहण्याची शक्‍यता आहे. 

भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. "उत्तर'चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यशवंत धोंगडे, जिल्हा सह निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजकुमार पाटील, सरचिटणीस हनुमंत कुलकर्णी यांनी काम पाहिले. यावेळी माजीमंत्री देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर उपस्थित होते. 

तालुक्‍यात भाजपचे काम प्रत्येक गावात शेवटच्या घटकापर्यंत पोचवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्या. पक्षातील जुने-नवे कार्यकर्ते, पदाधिकारी, ज्येष्ठ मंडळींना सोबत घेऊन पक्ष वाढविण्याचे आवाहन श्री. देशमुख यांनी केले. यावेळी संदीप सुरवसे, संग्राम पाटील, सुनील गुंड, संजय भोसले, अमोल घोडके, सूर्यकिरण भोसले, संभाजी दडे, किसन पाटोळे, विनोद पवार, पद्माकर माने, सतीश लामकाने, सुहास भोसले, सुशांत गरड, नागनाथ बचुटे, प्रभू राठोड, श्रीकांत पाटील, राजू सलगर, सचिन भिंगारे, ज्ञानेश्‍वर बंडगर, अमोल सुतार, विनायक सुतार, राजेंद्र चव्हाण, निर्मला कुंभार, आबाराव कापसे, इनायत अली जागीरदार, सचिन लंबे, मनोज मोहिते, लिंबाजी जाधव, युवराज पवार, भागवत लामतुरे, विकास पाटील, अंबिर बोंगे, प्रभाकर फूलसागर, दिलीप गिरी उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP gave these faces a chance again in solapur