आता राहणार नाही भाजपचे सरकार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

दहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

दहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

दहिवडी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मलवडी या तिसऱ्या शाखेच्या उद्‌घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, माजी शिक्षण सभापती ॲड. भास्करराव गुंडगे, अतुल जाधव, अर्जुन काळे, काँग्रेसचे माण तालुकाध्यक्ष एम. के. भोसले, दहिवडीचे उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, सरपंच दादासाहेब जगदाळे, नितीन दोशी, डी. एस. काळे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब काळे, दहिवडी नगरपंचायतीचे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले,‘‘साखळी बंधाऱ्याची मूळ कल्पना माण-खटावमधून आली. या कामांचा चांगला उपयोग होतो हे दिसून आले. पण, पाऊसच पडला नाही तर दुष्काळाची समस्या निर्माण होते. सध्या परिस्थिती बिकट असली तरी निराश न होता जलसंधारणाची कामे केली पाहिजेत. झाडे लावली पाहिजेत. दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाई आहे. हे सरकार चारा छावण्यांना नकार देते आहे. पण, या सरकारला हे कळत नाही की माणसाला प्यायला पाणी नाही तर जनावरांना कसे मिळणार. या सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही.’’आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘‘उरमोडीचे पाणी पिंगळी तलावात आल्याचा आनंद आहे.

त्याचबरोबर उत्तर माणच्या दुष्काळाचे दु:ख आहे. या सरकारकडून जिहे-कटापूरची फक्त आश्वासने सुरू आहेत. पण, या योजनेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या निधी व्यतिरिक्त एकही रुपयाचा निधी या सरकारने दिलेला नाही. त्यावेळी दिलेल्या पैशावरच आज सर्व कामे सुरू आहेत. काँग्रेसचे सरकार आले की एका वर्षात जिहे-कटापूरचे काम पूर्ण करू.

जिहे-कटापूरचे पाणी उत्तर माणला लिफ्ट करून देवू. मी शब्द देतो की २०१९ मध्ये पुन्हा आमदार झालो तर जिहे-कटापूरचे पाणी आंधळी तलावात आणल्याशिवाय पुन्हा निवडणूक लढविणार नाही.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Government Prithviraj Chavan Congress Politics