फुटीर नगरसेवकांना भाजप आज देणार नोटीस...

BJP to issue notice to split corporators today ...
BJP to issue notice to split corporators today ...

सांगली ः महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत व्हिप डावलून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या व गैरहजर राहणाऱ्या भाजपच्या सात फुटीर नगरसेवकांचा अखेर कारवाईच्या सोमवारी नोटिसा दिल्या जाणार आहेत. त्यांना म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी दिली. 

महापालिकेतील महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत बहुमत असतानाही सत्ताधारी भाजपला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी हे महापौर, तर कॉंग्रेसचे उमेश पाटील उपमहापौरपदी निवडून आले.

भाजपची सात मते फुटल्याने धीरज सूर्यवंशी व गजानन मगदूम यांना पराभव पत्कारावा लागला. सातपैकी आनंदा देवमाने व शिवाजी दुर्वे हे दोघे मतदानास गैर हजर राहिले; तर स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, नसीमा नाईक, अपर्णा कदम व विजय घाडगे या पाच जणांनी थेट कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे भाजपची सत्ता गेली. 

दोन्ही कॉंग्रेसने घोडेबाजार करत आमचे नगरसेवक फोडले व सत्ता मिळवली, असा आरोप भाजपने केला आहे. तसेच फुटीर सात सदस्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अपात्र ठरवणार असल्याचा इशाराही पक्षाने दिला होता. त्यानुसार आता ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. या फुटीर नगरसेवकांना कायदेशीर हिसका दाखवण्यासाठी भाजपने पुणे व मुंबई येथील तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेण्यात आला आहे.

या सातही नगरसेवकांना सोमवारी अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या जाणार आहेत. पक्षाचा व्हिप डालवून त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना का मतदान केले? याप्रकरणी त्यांना नियमानुसार अपात्र का करू नये? याबाबत नोटीस बजावली जाणार असून, यावर म्हणणे सादर करण्यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. ही नोटीस शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर व महापालिकेतील भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांच्या सहीने बजावण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com