रायबाच्या शिक्षणासाठी लाखमोलाची मदत; तानाजी मालुसरेंच्या कुटुंबियांची भावना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

समाजातील प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन अतुल भोसले यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

कऱ्हाड : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटामुळे नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची शौर्यगाथा पुन्हा लोकांसमोर आली. या चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला जमविला असला तरी ज्या तानजी मालुसरे यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या कुटुंबीयांकडे मात्र कुणाचे फारसे लक्ष गेले आहे. या कुटुंबाच्या धैर्याला आणि तानाजी मालुसरे यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी त्यांचे वंशज रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस अतुल भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत डॉ. भोसले यांनी तानाजी मालुसरे यांच्या थेट वंशज शीतल मालुसरे यांच्याकडे नुकताच 50 हजाराचा धनादेश सुपूर्द केला.

जयवंत इंजिनियरिंग महाविद्यालय व जयवंतराव भोसले पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने शिवमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे यांना प्रमुख निमंत्रित म्हणून बोलविण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व प्रेरणेने काम करत स्वराज्यासाठी बलिदान देणार्‍या मावळ्यांच्या वंशजांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. समाजातील प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन अतुल भोसले यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

जरुर वाचा : सदाशिवगड : मुले दरीत अडकली...पालकांचा टाहाे अन्...

शीतल मालुसरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याम्हणाल्या, की सगळी सोंगे करता येतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही. राज्यात प्रथमच डॉ. अतुल भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने स्वराज्यासाठी बलिदान देणार्‍या वंशजांना अशाप्रकारची मदत केली असून, रायबाच्या शिक्षणासाठी आमच्यासाठी ही मदत लाखमोलाची आहे. याप्रसंगी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, शिवव्याख्याते अरूण घोडके, शिवकालीन शस्त्र संग्राहक गिरीश जाधव, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य संजय पवार, कृष्णा फौंडेशनचे कार्यकारी संचालक प्रा. डॉ. विनोद बाबर, कृष्णा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. बी. साळुंखे, प्राचार्य डॉ. उदयसिंह सुतार, सुमित माळी यांच्यासह विद्यार्थी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : ऐका : मी काय अशी तशी वाटले का ? दाेन लाख सत्तर हजारच पाहिजेत

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Leader Atul Bhosale Took Education Responsiblity Of Tanaji Malusre Descendants