ऐका : मी काय अशी तशी वाटले का ? दाेन लाख सत्तर हजारच पाहिजेत

ऐका : मी काय अशी तशी वाटले का ? दाेन लाख सत्तर हजारच पाहिजेत

सातारा : तळमावले (ता. पाटण) येथील महिलांना एकत्र करून दारूबंदीचा लढा उभारला आहे. त्यांच्याविरोधात काही लोकांनी चुकीचा संदेश समाज माध्यमातून पसरविला आहे. त्याची सखोल चौकशी करून बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्या व सिताई फौंडेशनच्या अध्यक्षा कविता सतीश कचरे यांनी ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक उत्तमराव भजनावळे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. दरम्यान, साकव पुलाच्या 27 लाखांच्या कामाच्या बदल्यात ठेकेदाराला दोन लाख 70 हजार रूपयांची मागणीचा कचरे यांचा ठेकेदाराशी झालेला संवाद व्हायरल झाल्याने सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
 
रविवारी (ता. 23) समाज माध्यमांमधून महिला सामाजिक कार्यकर्त्या व ठेकेदार यांच्यातील संवाद व्हायरल झाला. या संवादात साकव पुलाच्या 27 लाखांच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराकडून कामाच्या किंमतीच्या दहा टक्के म्हणजे दोन लाख 70 हजार रूपयांची मागणी संबंधित महिला करीत आहे. संबंधित साकव पूलाचे काम कसे मंजूर आणले. त्यासाठी किती खस्ता खालल्या. लोकप्रतिनिधींची मर्जी राखण्यासाठी काय काय केले हे सर्व त्या संवादातून ठेकेदारास सांगत आहेत. त्यांच्यासमवेत असलेल्या कार्यकर्त्याला देखील त्या खडेबोल सुनावत आहेत. त्यांचा हा संवाद आता सर्वत्र घुमू लागल्याने सातारा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान हा संवाद जाणिवपुर्वक पसरविला जात असल्याची माहिती खूद्द संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार अर्ज देऊन स्पष्ट केले आहे.

नक्की वाचा : Video : बाप हो देव पाहिला का देव ?

याबाबत सिताई फौंडेशनच्या अध्यक्ष कविता कचरे यांनी ढेबेवाडी पोलिसांत दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले की, तळमावले (ता. पाटण) येथील महिलांना एकत्र करून आम्ही दारूबंदीचा लढा उभारला आहे. त्यावर उद्या (बुधवारी) निर्णय होणार आहे. मात्र, काही लोकांनी माझ्याविषयी चुकीचा संदेश सोशल मिडियावर पसरविला आहे. त्याची सखोल चौकशी करून हे कोणी पसरविले आहे त्याचा शोध लावून सहकार्य करावे. तसेच माझी बदनामी करणाऱ्यावरती कायदेशीर कारवाई करावी. गणेश यादव नावाने संदेश पसरविला आहे. हा तक्रार अर्ज ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक उत्तमराव भजनावळे यांच्याकडे कचरे यांनी दिला आहे.

पाटण तालुक्‍यात दारूबंदीसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात लढा उभा केलेला आहे. काही ठिकाणी मतदान घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे चिन्ह आहे. उद्या (बुधवारी) ताईगडेवाडी येथे दारूबंदीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, कचरे या सामाजिक कार्यकर्त्या आहेत तसेच त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्यानेहमी दारूबंदी चळवळीत आघाडीवर असतात. उद्या (बुधवार) होणाऱ्या दारूबंदीसाठी होणाऱ्या मतदानाकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


सामाजिक कार्यकर्त्या, त्यांचा कार्यकर्ता आणि ठेकेदारांमधील संवाद....

हॅलाे...मॅडम त्यांनी सत्तर हजार रुपये देण्यास सांगितले आहे. मॅडम ठेकेदारास म्हणतात कोणी सांगितले...गणेशने...मॅडम म्हणाल्या दाेन लाख सत्तर हजार....27 लाखांचे काम आहे ना, दहा टक्‍क्‍यांनी किती होतात. पण मॅडम ते काम 60 टक्केपण नाही ना. मॅडम म्हणतात दोन लाख सत्तर हजार छोटासा साकव बसणार आहे. ते काम तुमच्या हातात आहे. ते मॅनेज करणे वगैरे. प्रत्येकाने मॅनेज केल्यावर काही विषय राहतोय का. त्यावर ठेकेदार म्हणतो अहो पण क्रॉस चेकींगचे काय. मॅडमचा राग अनावर होतो आणि त्या म्हणतात ओ क्रॉस चेकींगचे सोडा. इथं शंभूराजे आणि माझे पुर्ण क्रॉस असूनही मी त्यांच्याशी कॉम्प्रोमाईज केले आहे. त्यांचा नुकताच मी सत्कार केला आहे. का तर आपली कामे अडू नयेत. सत्तर हजारापेक्षा देऊच नका ना. हे बघा मला काही नाही मिळाले तरी चालले.

कविता कचरे काय अशी.....उदयन महाराजांच्या कार्यक्रमाचा अडीच लाख रुपये खर्च मी केला आहे. महाराजांच्या....आणि तुमच्या सत्तर हजारासाठी मला काय होणार आहे. तुमच्या सत्तर हजार रुपयांनी मला काय होणार आहे. ताईगडेच्या ग्रामपंचायतीच्या कामांना सत्तर हजार रुपये रोख मी घातले आहेत. तेव्हा कार्यकर्ता म्हणतोय अहो पण त्याला काम परवडत नाही. मॅडम म्हणतायेत त्यांना करायचे नसेल तर दूसरा एखाद करेल. गणेश तू माझ्यापुढे आवाज करु नकोस. मी सदाभाऊ यांच्या घरी 100 वेळा जाऊन काम मंजूर करुन आणले आहे. तेव्हा कार्यकर्ता म्हणतो इज्जतीचा सवाल आहे. त्यावर महिला म्हणते तू काय म्हणतोयस इज्जतीचा सवाल. हे रेकॉर्ड होतेय. मी तूला काय शिव्या दिल्यात का. कार्यकर्ता म्हणतोय इतकी पेपरबाजी झालीय. त्यावेळी महिला म्हणजे काही असू देत काम बंद पडले तरी चालेल. विरोधकांचे काम आहे म्हणून शंभूराजेंनी अडविले असे लोक समजतील. माझी इज्जत कमी होणार नाही. मी बाई असून कष्ट करुन आणले आहे. मी खंडागळे यांच्याशी बोलते. ते सर्व व्यवस्थित करतील. त्यांचा पण विषय करा. मला दोन लाख सत्तर हजार रुपये आणून द्यायचे. संस्थेत आणून द्या.

हेही वाचा : राजे की राजकारणी ? जबाब द्या

वाचा : नराधमांनी माझ्या मुलाचा घात केला; न्याय मिळावा; आईची आर्त हाक

आपण भेटून चर्चा करु असे ठेकेदार म्हणताच मॅडम म्हणाल्या चर्चा वगैरे काही नको मी भरपूर खस्ता खालल्या आहेत. ठेकेदार वारंवर म्हणतोय मला परवडत नाय हो. मॅडम म्हणताहेत अहो खूप छोटा साकव आहे. त्यावर ठेकेदार म्हणतो आमच्या नावावर कोण करीत असेल तर आमची काही हरकत नाही. तुमच्या डिमांडमध्ये कोण करीत असेल तर द्या. बर ठीक आहे तुम्ही वर्क ऑर्डर आणून द्या. कार्यकर्त्यांसाठी काय करायला जावे तर काय....ठेकेदारास वर्क ऑर्डर द्यायला सांगतात. ठेकेदार म्हणतो मी पण तुमच्याच पक्षाचे काम करतो. कोळ्याच्या सरपंचांना विचारा. तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये दुमत नको. कामाच्या पहिल्यांदाच काही गोष्टी ठरविणे गरजेचे होते. त्यावर मॅडमने कशाला पहिलाच कामात तमाशा असे म्हणून त्यातुम्ही वर्क ऑर्डर आणून. मी स्वतः काही नाही. गणेशवर सर्व सोडले होते. मी फक्त पाठपूरावा केला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com