उदयनराजेंचा भाजपला 'घरचा ठेचा'! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

माहिती घेऊन उत्तर देऊ : पावसकर 
भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "मी सध्या मुंबईत आहे. येथे जिल्हाध्यक्षांची बैठक आहे. त्या बैठकीनंतर परतल्यावर त्याबाबतची माहिती घेऊन नक्की उत्तर देऊ. मात्र, तूर्त मुंबईत असल्याने काहीही बोलता येणार नाही.'' 

कऱ्हाड : भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना व्यासपीठावरून खेचून ठेचले असते, असे वक्तव्य माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे मुस्लिम समाजाच्या बैठकीत केल्याने कऱ्हाड परिसरातील भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपचे पदाधिकारीही व्यथित झाले आहेत. उदयनराजे यांनी नेमक्‍या कोणत्या अर्थाने वक्तव्य केले, याची चर्चा आता रंगू लागली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या तिकिटावर पराभूत झाले. तो पराजय विसरून दोन दिवसांपासून त्यांनी पुन्हा कार्यकर्त्यांशी संपर्क मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार काल त्यांनी येथील मुस्लिम समाजातील लोकांशी संवाद साधला. त्या संवाद मेळाव्यात त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष पावसकर यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांच्याबद्दल बरीचशी वादग्रस्त वक्तव्ये केली. कोणता हिरवा गुलाल, कोणता मिनी पाकिस्तान? असे काही नसते. पावसकर यांनी अशी काही वक्तव्ये विधानसभेच्या प्रचाराच्या सांगता सभेत केली आहेत, त्यांचा मी निषेध करतो. मी जर त्या व्यासपीठावर असतो, तर त्यांना खाली खेचले असते, असे वक्तव्य केले. त्यावरून भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. कार्यकर्त्यांत त्या वक्‍तव्याचे मोठे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. त्यांनी ते वक्तव्य करण्यामागे नेमके कारण काय? याची सध्या चर्चा सुरू आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेला झुकते माप देण्याची शक्यता

येथील स्थानिक निवडणुकीचा संदर्भ देवूनही येथे चर्चा सुरू आहे. त्या चर्चेला अनेक स्थानिक राजकारणाचे संदर्भ जोडले जात आहेत. उदयनराजे राष्ट्रवादीत असताना त्यांनी नेहमीच वेगळी वक्तव्ये केलेली आहेत. त्यामुळे तेथे राष्ट्रवादीला घरचा आहेर मिळायचा. आता भाजपला त्यांनी घरचा "ठेचा' दिला आहे, अशी टिप्पणी सोशल मीडियावर केली जात आहे. सोशल मीडियावर फिरणारे उदयनराजेंचे वक्तव्य नेमक्‍या कोणत्या राजकारणाची नांदी ठरणार, याचा अंदाज लावण्याचे प्रयत्न भाजपचे पदाधिकारी करताहेत. त्यामुळे त्याच्या नक्की कशा प्रतिक्रिया उमटणार, हेही आता पाहण्याची उत्सुकता सामान्यांसह राजकीय वर्तुळात दिसू लागली आहे. 

'105 किंकाळ्या' आणि वेड्यांचा घोडेबाजार; शिवसेनेचा वार

माहिती घेऊन उत्तर देऊ : पावसकर 
भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "मी सध्या मुंबईत आहे. येथे जिल्हाध्यक्षांची बैठक आहे. त्या बैठकीनंतर परतल्यावर त्याबाबतची माहिती घेऊन नक्की उत्तर देऊ. मात्र, तूर्त मुंबईत असल्याने काहीही बोलता येणार नाही.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Udyanraje Bhosale targets Vikram Pawaskar