रडीचा डाव मी खेळत नाही : उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 October 2019

रडीचा डाव मी खेळत नाही. आदरणीय पाटीलसाहेब जिंकले हे खरं आहे. पण लोकसेवा काय केली हे लोकांनी पाहिले पाहिजे. यापुढेही मी जनतेसाठी कार्यरत राहणार असून खचणार नाही.

सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झाल्यानंतर भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार) पुन्हा एकदा ट्विट करत मी रडीचा डाव खेळत नाही, असे म्हटले आहे.

राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या व अत्यंत चुरशीच्या झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उदयनराजे भोसले यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील सुमारे 85 हजार मतांनी विजयी झाले. या विजयानंतर सोशल मीडियावर श्रीनिवास पाटील यांचे कौतुक करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सातारकरांचे आभार मानले आहे.

शुक्रवारी आज हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाहीं पण संपलो ही नाही, असे ट्विट करणाऱ्या उदयनराजेंनी आज पुन्हा ट्विट करत म्हटले आहे, की रडीचा डाव मी खेळत नाही. आदरणीय पाटीलसाहेब जिंकले हे खरं आहे. पण लोकसेवा काय केली हे लोकांनी पाहिले पाहिजे. यापुढेही मी जनतेसाठी कार्यरत राहणार असून खचणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Udyanraje Bhosale tweet about loss in satara