...तर भाजप निष्ठावंतांची 'नोटा' ला पसंती 

Nota
Nota

मायणी : माणचे नेते जयकुमार गोरे यांनी काँग्रेसच्या हाताला झटका देत भाजपाचे कमळ हाती घेतले. मात्र, निष्ठावंत नेत्यांना डावलुन गोरेंना उमेदवारी दिल्यास आम्ही 'नोटा'ला पसंती देवु. असा नाराजीचा सूर खटाव माणमधील भाजपचे कार्यकर्ते आळवु लागले आहेत.

लोकसभेच्या निवडणुकींपासुनच जयकुमार गोरे भाजप‍त जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र गोरेंनी भाजपात प्रवेश करुन प्रत्यक्ष कमळ हाती घेतल्याने त्या चर्चेला पुर्णविराम मिळाला. आता त्यांच्या भाजप प्रवेशानंतर काय काय होणार याच्या चर्चा रंगु लागल्या आहेत. गोरे भाजपवासी झाल्यानंतर आता  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांंना उधाण आले आहे.

iPhone11 : ट्रिपल कॅमेऱ्यासह 'आयफोन 11' लाँच; किंमत आवाक्यात
माण मतदार संघ भाजपकडे जाणार की सेनेकडे. भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार. जयकुमार गोरेंना उमेदवारी मिळाली तर भाजप नेते डॉ. दिलीप येळगावकर व अनिल देसाईंचे काय होणार. त्यांची भुमिका काय असणार. वरिष्ठ नेत्यांनी गोरेंसाठी काम करण्याचे आदेश दिल्यास येळगावकर व देसाईंची भाजपा निष्ठा राहणार का. कानामागुन येवुन तिखट झालेल्या गोरेंना निवडुन आणण्यासाठी येळगावकर व देसाईंचे कार्यकर्ते जीवाचे रान करणार का. कार्यकर्त्यांच्या नाराजीचा, नेत्यांतील चढाओढ व दुहीचा काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फायदा होणार का. अशा विविधांगी चर्चांनी राजकीय वातावरण तापु लागले आहे.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचा संभ्रम
तर खटाव माणमधील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ झालेत. नाराजीचा सूर आळवु लागलेत. निष्ठावंतांनी नुसत्या सतरंज्याच उचलायच्या काय. आम्ही आता कोणाचेही ऐकणार नाही. भाजपा कार्यकर्त्यांना अपेक्षित असलेल्या नेत्याला उमेदवारी दिली नाही तर आम्ही नोटाचा पर्याय वापरु. अशा भावना कार्यकर्त्यातुन व्यक्त होत आहेत. त्यामुळे संबंधित नेत्यांची छातीही छपन्न इंच फुगत आहे. तरीही उमेदवारी आपणास मिळणार नसल्याच्या विचाराने नेतेही अस्वस्थ झाले आहेत. भाजपा पक्ष श्रेष्ठींनी फसवणुक केल्याची भावना कार्यकर्त्यासह नेत्यांमध्येही बळावु लागली आहे. उमेदवारी मिळाली नाही तर कोणते डावपेच टाकायचे या विचारचक्रात इच्छुक नेते गुरफटले आहेत. त्यातच माणची उमेदवारी शेखर गोरेंना देण्याचे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे युतीचा उमेदवार गोरे बंधुंपैकीच एकजण असणार आहे. यांस सर्वांकडुन दुजोरा मिळत आहे.

Vidhansabha 2019 : युतीचे घोडे 'मित्रपक्षा'वरून अडले
दरम्यान, डॉ. येळगावकरांनी कालच येथील एका कार्यक्रमात समर्थक कार्यकर्त्यांच्या अस्वस्थतेची दखल घेऊन, आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असा दिलासा दिला. मात्र कार्यकर्ते अद्याप सोशल मिडियावर नाराजी व्यक्त करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, माण मतदारसंघात राजकीय वातावरण वेगाने तापु लागले असुन, प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच खर्‍या अर्थाने नेते व कार्यकर्त्यांची खदखद वा जल्लोष अनुभवास येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com