esakal | 'राज्य सरकारने किती ऑक्सीजन प्लांट उभे केले हे जाहीर करावे'
sakal

बोलून बातमी शोधा

'राज्य सरकारने किती ऑक्सीजन प्लांट उभे केले हे जाहीर करावे'

'राज्य सरकारने किती ऑक्सीजन प्लांट उभे केले हे जाहीर करावे'

sakal_logo
By
स्नेहल कदम

सांगली : आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नसल्याची माहिती दिली आहे. केंद्र सरकारने (central government) ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नाहीत असे जाहीर केल्यामुले केंद्र सरकाला धारेवर धरले आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक राज्यांच्या लोकप्रतिनिधींनी यावर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना नेते संजय (sanajy raut) राऊत यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हे सरकार भ्रमिष्ट झाले असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यां नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, राऊत यांच्या या वक्तव्यानंतर शेतकरी नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांना ट्वीट करुन राज्यसरकारवर टीका केली आहे. ते म्हणतात, केंद्रावर दावा दाखल करण्याआधी राज्य सरकारने किती ऑक्सीजन प्लांट उभे केले हे जाहीर करावे. आम्ही विधानपरिषदेच्या सभागृहामध्ये सरकारला इशारा दिला होता की कोरोनाची जर दुसरी लाट आली तर ऑक्सीजनचा तुटवडा जाणवेल व ऑक्सीजन अभावी लोक किड्यामुंगी सारखे मरतील. तरी सुद्धा सरकार गाफील राहिले असल्याची खोचक प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नसल्याचा दावा केल्यानंतर विरोधी पक्षांतील नेत्यांकडून अनेक प्रतिक्रीया उमटत आहेत. सरकारच्या या उत्तरावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतापले आहेत. केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असल्याचेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार

loading image