महापालिका स्थायी समितीवर भाजप आमदारांचे वर्चस्व...सुरेश आवटी आणि दिनकर पाटील गटाला धक्का 

बलराज पवार
Friday, 18 September 2020

सांगली-  सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीत भाजपच्या आमदारांचे वर्चस्व राहिले. सुरेश आवटी आणि दिनकर पाटील गटाला धक्का बसला. भाजपने सुनंदा राऊत, अनिता व्हनखंडे, सविता मदने या तीन महिला सदस्यांना संधी दिली आहे. कॉंग्रेसने पद्मश्री पाटील यांची निवड केली. त्यामुळे आज जाहीर झालेल्या आठ सदस्यांमध्ये चार महिलांना प्रथमच स्थायीच्या कामकाजात भाग घेण्याची संधी मिळाली आहे. 

सांगली-  सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीत भाजपच्या आमदारांचे वर्चस्व राहिले. सुरेश आवटी आणि दिनकर पाटील गटाला धक्का बसला. भाजपने सुनंदा राऊत, अनिता व्हनखंडे, सविता मदने या तीन महिला सदस्यांना संधी दिली आहे. कॉंग्रेसने पद्मश्री पाटील यांची निवड केली. त्यामुळे आज जाहीर झालेल्या आठ सदस्यांमध्ये चार महिलांना प्रथमच स्थायीच्या कामकाजात भाग घेण्याची संधी मिळाली आहे. 

महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या निवडी आज जाहीर करण्यात आल्या. महापौर गीता सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन महासभेत भाजपचे सभागृह नेते युवराज बावडेकर, कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर आणि राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी महापौरांकडे आपआपल्या पक्षाच्यावतीने सदस्यांची नावे बंद लिफाफ्यातून सादर केली. महापौर सौ. सुतार यांनी नूतन सदस्यांची नावे जाहीर करून त्यांच्या निवडी झाल्याचे सांगितले. 

सत्ताधारी भाजपकडून स्थायी समितीत जाण्यासाठी मोठी चुरस होती. 20 नगरसेवकांनी इच्छुक असल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. भाजपचे नेते शेखर इनामदार, तसेच गटनेते युवराज बावडेकर यांनी इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना कळवली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, शेखर इनामदार यांच्याशी चर्चा करुन पाच नावे निश्‍चित करून ती गटनेत्याकडे पाठवून दिली होती. 

पहिल्या दोन वर्षांत सुरेश आवटी आणि माजी आमदार दिनकर पाटील गटाचे स्थायी समितीवर वर्चस्व होते. त्यांना धक्का देत मिरजेचे आमदार सुरेश खाडे समर्थक अनिता व्हनखंडे आणि पांडुरंग कोरे यांना संधी मिळाली. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ समर्थक सविता मदने तसेच सुनंदा राऊत आणि संजय यमगर या तिघांना संधी देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत स्थायी समितीच्या कारभारावरून भाजपवर मोठ्या प्रमाणात आरोप झाल्याने यावेळी पक्षाशी निष्ठावान असलेल्यांना संधी देण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला. 
कॉंग्रेसने मिरजेचे करण जामदार आणि सांगलीतील नगरसेवक पद्मश्री पाटील या नवीन चेहऱ्यांना संधी दिली. राष्ट्रवादीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मर्जीतील अनुभवी नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांना संधी दिली आहे. 

स्थायी समिती सदस्य-
भाजप : अनिता व्हनखंडे, पांडुरंग कोरे, सविता मदने, सुनंदा राऊत, संजय यमगर 
कॉंग्रेस : पद्मश्री पाटील, करण जामदार 
राष्ट्रवादी : दिग्विजय सूर्यवंशी 

सभापतीपद कुपवाडला ? 
स्थायी समितीच्या सदस्यपदी आठ नव्या सदस्यांची आज निवड झाली आहे. त्यानंतर आता सभापती कोण होणार याची उत्सुकता वाढली आहे सभापतीपदासाठी भाजपकडून कुपवाडचे गजानन मगदूम आणि मिरजेचे पांडुरंग कोरे यांची नावे चर्चेत आहेत. सत्ताधारी भाजपने गेल्या दोन वर्षात खूप वाढला कोणतेही मोठे पद दिले नसल्याने यावेळी स्थायी सभापतीपद मिळण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLAs dominate Municipal Corporation Standing Committee