माढ्यातून भाजपचाच खासदार : विजयकुमार देशमुख

प्रमोद बोडके
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून माढ्यातून भाजपचा खासदार करण्याची जबाबदारी माझी असल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आहे. 

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून माढ्यातून भाजपचा खासदार करण्याची जबाबदारी माझी असल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आहे. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत माढ्याची जबाबदारी महायुतीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढविली होती. सदाभाऊ खोत यांचा अवघ्या पंचवीस हजार मतांनी पराभव झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजयसिंह मोहिते-पाटील येथून खासदार झाले. माझ्याकडे पालकमंत्री पदाची सूत्रे हाती आल्यापासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातील महत्वाचे कार्यकर्ते जोडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांनूसार जिल्ह्यातील समविचारील ग्रुपला सोबत घेतले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे व आमदार प्रशांत परिचारक यांच्या समविचारी ग्रुपनेही भाजपच्या उमेदवाराला सहकार्य करण्याची ग्वाही दिली असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. 

2014 मध्ये स्वाभिमानीने माढ्याची जागा लढविली होती. या मतदार संघात भाजपकडे प्रभावी चेहरा नसल्याने 2019 च्या निवडणूकीसाठी बाहेरच्या उमेदवारावरच भाजपची मदार आहे. गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदार संघात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी संपर्क वाढविला आहे. माढ्यातील भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून सहकारमंत्री देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीकडून 2019 साठी विद्यमान खासदार मोहिते-पाटील, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपक साळुंखे यांच्या नावाची चर्चा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Mp will be from Madha said vijaykumar deshmukh