

आष्टा : नगरपालिकेच्या रस्तेकामासाठी निविदा भरण्यावरून भाजप व राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या तालुका पदाधिकाऱ्यांत शिवीगाळ, धक्काबुक्की झाली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की आष्टा शहरातील नगरपालिकेकडे वार्षिक रस्तेविकास नफा-तोटा निधी योजनेतील सहा ठिकाणच्या अंदाजे ३७ लाखांच्या रस्ते कामासाठी आज दुपारी ४ पर्यंत निविदा दाखल करायच्या होत्या.