भाजपच्या " लिटमस टेस्टमध्ये" आमदार भालके-शिंदे नापास !

भारत नागणे 
रविवार, 1 सप्टेंबर 2019

"राज्यातील राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचे आमदार, नेते भाजप सेनेच्या वाटेवर असतानाच, सोलापूर जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांना मात्र भाजप सेनेने प्रवेश नाकारल्याची चर्चा सुरु आहे.

पंढरपूर : "राज्यातील राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचे आमदार, नेते भाजप सेनेच्या वाटेवर असतानाच, सोलापूर जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांना मात्र भाजप सेनेने प्रवेश नाकारल्याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, पंढरपूचे काॅंग्रेसचे आमदार भारत भालके हे भाजपच्या लिटमस चाचणीमध्ये सपशेल नापास झाल्याने त्यांच्याही भाजप प्रवेशा विषयीआता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर माढ्याचे आमदार बबन शिंदेंना देखील भाजपमधून विरोध असल्याने त्यांनाही अजून वेटिंगवरच ठेवण्यात आले आहे.

पंढरपूर तालुक्याचे पंढरपूर, माढा, सांगोला आणि मोहोळ या चार विधानसभा मतदार संघामध्ये विभाजन झाले आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात  राजकीय वातावरण तापू लागले आहे. पंढरपूरचे काॅंग्रेसचे आमदार भारत भालके मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु आहे.

सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक राष्ट्रवादी आणि काॅग्रेसचे बडे नेते येत्या 5 सप्टेंबर रोजी मुंबईत भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश करणार आहेत. यामध्ये काॅंग्रेस आमदार भारत भालके आणि राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचे नाव नसल्याने भालके -शिदे गोटात चिंता वाढली आहे.

पंढरपूर विधानसभा मतदार संघातून आमदार भारत भालकेंनी पुन्हा दंड थोपटले आहेत, परंतु पक्ष आणि गट कोणता हे मात्र अजून निश्चित नाही. आमदार भालकेंचे प्रतिस्पर्धी आमदार प्रशांत परिचारक गटाची भूमिका शांत होती परंतु परिचारक गटाने आज मंगळवेढा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. यामध्ये आमदार परिचारकांनी आमचं पण ठरलयं असा  कार्यकर्त्यांना संदेश दिला. तर जे कोणी आमदार भाजपमध्ये प्रवेश द्या म्हणून मुख्यमंत्र्यांकडे हेलपाटे मारत आहेत, ते भाजप प्रवेशाच्या कसोटीवर उतरले नाहीत. त्यातच भाजपच्या लिटमस चाचणीमध्ये नापास झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी कोण उमेदवार असेल याची चिंता करु नका असेही आमदार परिचारकांनी स्पष्ट केल्यामुळे  परिचारकांची उमेदवारी आता पक्की मानली जाते.

आमदार भारलेंके अध्यक्ष असलेल्या विठ्ठल साखर कारखान्याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे.कामगारांचे अनेक महिन्यांचे पगार थकले आहेत.  एकूणच त्यांचा साखर कारखाना आर्थिक गर्तेत सापडल्यामुळे सभासद शेतकर्यांमध्ये ही  मोठी नाराजी आहे. अशातच मागील काही राजकीय घटना आणि घोडामोडींमुळे आमदार भालकेंवर भाजपातील काही वरिष्ठ नेते नाराज असल्याची देखील चर्चा सुरु आहे. त्यामुळेच आमदार भालकेंचा भाजप प्रवेश तुर्त लांबवणीवर पडल्याचे भाजप कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's "litmus test" MLA Bhalke-Shinde failed!