इस्लामपुरात भाजपचे टाळे ठोको आंदोलन 

शांताराम पाटील
Saturday, 6 February 2021

75 लाख वीज ग्राहकांना वीज कनेक्‍शन तोडणीची नोटिसी दिल्याच्या निषेधार्थ वाळवा तालुका व भाजप इस्लामपूर विधानसभा मतदार संघाच्या वतीने टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. 
 

इस्लामपूर : 75 लाख वीज ग्राहकांना वीज कनेक्‍शन तोडणीची नोटिसी दिल्याच्या निषेधार्थ वाळवा तालुका व भाजप इस्लामपूर विधानसभा मतदार संघाच्या वतीने टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. 

आंदोलनात सहभागी पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. 23 मार्च 2020 मध्ये देशात जागतिक महामारी आली. कोरोनामुळे सर्व देश लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्‍कील झाले असताना मीटर रीडिंग न घेता अवाजवी वीज बिल आकारणी विद्युत मंडळाने केली. 

वीज बिल आकारणीने ग्राहकांचे कंबरडे मोडले. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती भरू शकली नाही. हे वीज बिल माफ करावे, तसेच 75 लाख ग्राहकांना वीज कनेक्‍शन तोडणीची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप महाविकास आघाडी सरकार करत आहे. या नोटिसा मागे घ्याव्यात, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. यावेळी महाविकास आघाडीचा धिक्कार असो, लबाड सरकार हाय हाय, वीज बिल माफी झाली पाहिजे, वीज बिल माफ करा अन्यथा बिल वितरण केंद्राला टाळा ठोकू, आशा घोषणा देण्यात आल्या. 

वीजबिल माफ करावे अन्यथा बिल वितरण केंद्राला टाळा ठोकू, असा इशारा देण्यात आला. वाळवा तालुका कार्यकारी अभियंता श्री. सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. माजी आमदार भगवानराव साळुंखे, अशोक खोत, धैर्याशील मोरे, चंद्रकांत पाटील, संदीप सावंत, नगरसेवक अमित ओसवाल, चेतन शिंदे, माजी नगरसेवक कपील ओसवाल, सतीश महाडिक, डॉ. सतीश बापट, मधुकर हुबाले, विकास पाटील, अजित पाटील, संजय हवालदार, प्रवीण परीट, प्रवीण माने, गजानन फल्ले, अक्षय कोळेकर, विकास पाटील, मुकुंद रास्कर, धनराज पाटील, संदीप चव्हाण, रणजित माने, सर्जेराव जाधव-खोत, निवास पाटील उपस्थित होते. 

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's lockout movement in Islampur