मोदींच्या वाढदिवसाला भाजपचा "सेवा सप्ताह' 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

जिल्हा भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिली. 

सांगली ः जिल्हा भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिली. 

श्री. देशमुख म्हणाले, ""संपूर्ण भारतभरात भाजप सेवा सप्ताहाच्या रुपात पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करणार आहे. कोविड-19 बाबत सर्व दक्षता घेत आणि शासकीय नियम व सूचना यांचे पालन करून अनेक ठिकाणी हा सप्ताह साजरा केला जाईल. या सेवा सप्ताहात प्रत्येक मंडलामध्ये वृक्ष लागवड अभियान, स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्ती अभियान, मोफत कायदेविषयक सल्ला शिबिर, रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम होतील.``

``पंडीत दीनदयाळ उपाध्याय आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्तचे कार्यक्रम 14 ते 20 सप्टेंबर या कालावधीत विविध सेवाकार्याचे आयोजन करून साजरी केले जाईल. या अभियानाची जबाबदारी मिलिंद कोरे यांच्याकडे असेल.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's 'Service Week' on Modi's birthday