

Recurring Occult Incidents in Walwa; Shene Village Witnesses Fresh Scare
esakal
-धर्मवीर पाटील
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) : वाळवा तालुक्यातील शेणे येथील स्मशानभूमीत करणी जादुटोण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे गावात दहशतीचे वातावरण तयार झाले होते. वाळवा तालुक्यात यापूर्वीही अशाच स्वरूपाचे अनेक प्रकार उघडकीस आले होते. या करणीच्या साहित्यात नारळ, लिंबू, काळी बाहुली, सुया, कोहळे, काळे कापड आदी साहित्य आढळले.