जंबगी येथील युवकाचा रस्त्याच्या कडेला मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

body of  youth from Jambagi was found at side of the road

जंबगी येथील युवकाचा रस्त्याच्या कडेला मृतदेह

अथणी : जंबगी (ता. अथणी) येथील युवक संतोष सुखदेव पाटील (वय ३०) याचा मृतदेह अथणी-जंबगी रस्त्याच्या कडेला गुरूवारी (ता. २८) आढळून आला. त्याच्या बाजूस विषाच्या बाटल्या आढळून आल्याने याविषयी उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर समजलेली माहिती अशी, संतोष पाटील हा ट्रकचालक होता. ट्रकमध्ये विविध प्रकारचे साहित्य भरून अथणीत उतरवून परत गेला होता. त्याची भरलेली गाडी रस्त्याकडेला रूतली होती.

त्याबाबत मालकांना माहिती दिली. गुरुवारी सकाळी तो मृतावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती त्यांच्या गावी नातेवाईकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अथणी पोलिस ठाण्यास फिर्याद दाखल केल्यानंतर उपनिरीक्षक कुमार हाडकर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला. सरकारी दवाखान्यामध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह त्यांच्या अथणी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत अथणी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद आहे.

Web Title: Body Of Youth From Jambagi Was Found At Side Of The Road

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top