
जिल्ह्यात ‘बूस्टर’ डोसला मिळतोय थंडा प्रतिसाद
बेळगाव : जिल्ह्यात कोरोनाची पहिली आणि दुसरी मात्रा घेतलेल्यांची संख्या ७८ लाख १३ हजार इतकी असून, पैकी केवळ १ लाख जणांनी बूस्टर डोस घेतली आहे. यामुळे जिल्ह्यात बूस्टर डोसला थंडा प्रतिसाद मिळतो आहे.
कोरोनाची दुसरी लाट धडकली. या दरम्यान कोरोना प्रतिबंध डोस विकसीत करण्यात आले. लस विकसीत करण्यात आल्यानंतर त्याला व्यापक प्रतिसाद मिळाला. रांग लावून लोकांनी लशी घेतल्या. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. परिणामी अनेक केंद्रे बंद झाली आहेत. अत्यल्प प्रतिसाद लसीकरणाला मिळत आहे. बूस्टरलाही अपेक्षित प्रतिसाद नाही. जिल्ह्यात ३९ लाख ९० हजार ५२९ जणांनी कोरोनाची पहिली लस घेतली. तर दुसरी लस ३८ लाख २३ हजार १४६ जणांनी घेतली. तर दोन्ही मिळून सुमारे ७८ लाख १३ हजार जणांना कोरोनाची पहिली आणि दुसरी लस घेतली आहे. तर बूस्टर डोस घेणाऱ्यांचा आकडा १,०८,०४१ इतकी आहे. यामुळे बूस्टरला संथ प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाची तिसरी लाट जेमतेम दीड ते दोन महिने होती. त्यानंतर संसर्गने परतीचा मार्ग धरला. याचे परिणाम लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळात आहे. लस घेण्यासाठी खूप लोक पुढे येत नसल्याचे दिसते. त्यातून बूस्टर डोसला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते.
दरम्यान, आतापर्यंत २७ हजार ९६९ आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यात आले आहे. कोरोना योध्दा म्हणून नमूद असलेल्या विविध घटकांपैकी १३ हजार ३८४ जणांनी बूस्टर डोस देण्यात आली आहे. तर १८ ते ५९ या वयोगटामध्ये केवळ १५४ जणांनी बूस्टर डोस घेतली आहे. तर ६० पेक्षा अधिक वयोगटात ६६५३४ जणांना बूस्टर डोस देण्यात आलेले आहे. यामुळे आतापर्यंत ७८,२१,७१६ जणांचे लसीकरण झाले असून, त्यापैकी १०८०४१ जणांना बूस्टर डोस देण्यात आली आहे.
एक नजर
एकूण लसीकरण - ७८२१७१६
पहिली मात्रा -३९९०५२९
दुसरी मात्रा -३८२३१४६
बूस्टर -१०८०४१
Web Title: Booster Dos Getting Cold Response District Health Department
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..