esakal | कोरोनामुक्तीसाठी हालचाली; बोरगावात 7 दिवसांचा लॉकडाऊन
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुक्तीसाठी हालचाली; बोरगावात 7 दिवसांचा लॉकडाऊन

कोरोनामुक्तीसाठी हालचाली; बोरगावात 7 दिवसांचा लॉकडाऊन

sakal_logo
By
शामराव गावडे

नवेखेड (सांगली) : बोरगाव (ता. वाळवा) पूर्णपणे कोरोनामुक्त करण्यासाठी सोमवार ३ मे ते १० मेपर्यंत गाव पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे. सदर गाव बंदसाठी ग्रामस्थांनी पूर्णपणे सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत अत्यावश्यक शेतीसाठी लागणारी खते, औषधे, किराणा, भाजीपाला व आवश्यक साहित्याची खरेदी सकाळी ७ ते ११ या वेळेतच करून घ्यावी.

मागील आठवड्यात गावतील व्यवहार पूर्णपणे बंद ठेवल्याने कोव्हीड पेशंटची संख्या कमी झालेली आहे. ग्रामस्थांच्या सहकर्यामुळे बाधित रुग्णाची संख्या घटली आहे. कोरोनोची साखळी तोडण्यासाठी पुढील काळात ही काळजी घेणे गरजचे आहे. तरी ग्रामस्थांनो सहकार्य करून गावाचे आरोग्य अबाधित राखूया, असे आवाहन ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन समिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने लसीकरण, सॅनिटायझर फवारणी, कोविड रुग्णांची देखभाल अशा पद्धतीने उपाययोजना करण्यात येत आहे.

हेही वाचा: इस्लामपुरात बुधवारपासून जनता कर्फ्यू; व्यवहार राहणार बंद

loading image