
ग्राम कृषी विकास समितीच्या कामकाजावर ग्रामसेवकांचा बहिष्कार
झरे (सांगली) : ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी विकास समितीची (Gram Vikas Samiti) स्थापना करण्याचा आदेश कृषी मंत्रालयाकडून प्रत्येक ग्रामपंचायतला प्राप्त झाला आहे. ग्राम कृषी विकास समितीच्या सचिव पदी ग्रामसेवक (Gramsevak) असतात .परंतु या समितीच्या कामकाजावर ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकला आहे.
कोरोनाच्या कामकाजातून कृषी सहाय्यक यांना वगळण्यात आले आहे. तसेच ग्रामसेवक यांच्याकडे अनेक समितीची कामे असतात. सर्व ग्रामपंचायतचा कारभार सांभाळायचा असतो प्रोसिडिंग लिहायची असते. त्यामुळे कामाचा बोजा जास्त प्रमाणात पडत आहे म्हणून कृषी सहायकांना ग्राम विकास समितीचे सचिव बनवावे आम्ही कामकाज करणार नाही. असे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे राज्य प्रसिद्धीप्रमुख डि.के गळवे यांनी सांगितले.
Boycott of Gramsevaks by gram vikas samiti sangli update marathi news
शेती हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा व्यवसाय आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था शेतीशी निगडित आहे. हवामानातील बदल, लहरी पर्जन्यमान, कीड व रोग शेतीमालाच्या दरामध्ये अचानक होणारी घसरण इत्यादी बाबी विचारात घेऊन शेतीमधून शाश्वत उत्पन्न मिळेल यासाठी स्थानिक स्तरावर विचार विनिमय करून मार्गदर्शन होणया साठी ग्रामस्तरावर समिती ची आवश्यकता होती. या बाबीचा विचार करता महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लोकप्रतिनिधींनी कर्मचारी व कृषी तज्ञ यांचा सहभाग असलेली ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्याबाबत शासनाने दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये ग्राम कृषी समित्या स्थापन करण्याचे कृषी मंत्रालयाने कळविले आहे.
ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्तम विनियोग करणे .शासनाच्या कृषी विषयी सर्व योजना ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रसार व प्रचार करणे, आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण ,संरक्षित शेती ,फळबाग लागवड, बियाणे ,खते व इतर कृषी निविष्ठा, एकात्मिक कीड व्यवस्थापन, शेती पूरक व्यवसाय , पीक काढणी, तंत्रज्ञान व शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ याबाबत संबंधित विषय तज्ञांना समितीच्या बैठकीसाठी निमंत्रित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
हेही वाचा- ब्रेकिंग: कोल्हापूर जिल्ह्यात शनिवार रात्री 12 पासून कडक लॉकडाऊन
यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी विकास समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले योगदान मोलाचे ठरणार आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्राम कृषि विकास समितीची स्थापना करावी असे आदेश कृषी मंत्रालयाकडून आले असताना सुद्धा सचिव पदी कामकाज कोणी पहायचे म्हणून ग्राम कृषी विकास समितीच्या कामकाजाला खीळ बसली आहे.
ग्राम कृषी समितीचे सचिव म्हणून कामकाज करण्यास ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकल्याने समितीचे काम रखडले आहे.
पोपट पाटील- तालुका कृषी अधिकारी आटपाडी
कृषी सहाय्यक कोरोना च्या कामातून बाहेर पडले असून ग्रामसेवक यांच्याकडे अनेक समितीचे सचिव पद आहे. तसेच प्रोसिडिंग लिहिणे व इतर कामकाजाचा बोजा जास्त प्रमाणात असल्याने ग्राम कृषी समितीचे सचिव पद कृषी सहाय्यक यांनी सांभाळावे.
डी.के.गळवे - राज्य प्रसिद्धीप्रमुख महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ
Boycott of Gramsevaks by gram vikas samiti sangli update marathi news
Web Title: Boycott Of Gramsevaks By Gram Vikas Samiti Sangli Update Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..