
शिराळा : भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लायन्स हॉलमध्ये आयोजित गोसावी समाजातील विवाहितेच्या लग्नात आमदार सत्यजित देशमुख मामाच्या भूमिकेत दिसले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. लिंबूत खुपसलेली कट्यार घेऊन सत्तूभाऊ व्यासपीठावर होते. सोहळ्यातील त्यांचा सारा वावर कुटुंबातील एक वाटावा असा. जाती-पातीच्या बंधनात आणि बडेजावात बऱ्याचदा नात्यांमधील ओलावा हरवून जातो. जातीपालीकडेही माणसे पिढ्यांच्या स्नेहाने जोडली जातात. आमदार देशमुख यांनी आपल्या वर्तणुकीतून तो ओलावा जपला.