ब्रेकिंग : इस्लामपुरातील आणखी एका महिलेस "कोरोना'; रूग्णांची संख्या 22 वर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

इस्लामपूर (सांगली)- सौदी अरेबियातून हज यात्रा करून आलेल्या चौघांचा "कोरोना' चा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याची दिलासादायक बातमी असताना आज येथील आणखी एका महिलेला "कोरोना' झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

इस्लामपूर (सांगली)- सौदी अरेबियातून हज यात्रा करून आलेल्या चौघांचा "कोरोना' चा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याची दिलासादायक बातमी असताना आज येथील आणखी एका महिलेला "कोरोना' झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदर महिला येथील कोरोना बाधित कुटुंबाच्या संपर्कात आली होती. ती सध्या येथील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये निरीक्षणाखाली दाखल होती. आज सकाळी स्वॅबचे नमुने तपासण्यासाठी पाठवले होते. त्याचा अहवाल "पॉझिटीव्ह' आला. त्यामुळे कोरोना बाधित रूग्णांची संख्या 22 झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. 

दरम्यान संबंधित महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आला नाही. सौदी अरेबियातून हज यात्रा करून आलेल्या त्या चौघांचा दुसऱ्यांदा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यांना मिरजेतील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये 14 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तसेच या चौघांच्या संपर्कात आलेल्या त्याच कुटुंबातील 10 जणांचे 14 दिवसानंतरचे पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. दुसरा अहवाल दुपारपर्यंत प्राप्त झाला नव्हता. सायंकाळपर्यंत तो प्राप्त होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोरोना मुक्तीच्या दिशेने सांगली जिल्हा जात असतानाच आणखी एका महिलेस कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्याने अद्यापही धोका कायम असल्याचे पुढे आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking: "Corona" another woman in Islampur; number of patients at 22