ब्रेकिंग ः कर्जतच्या जेलमधून पाच आरोपींची धूम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

पळून गेलेले आरोपीपैकी काहीजण हे जामखेड तालुक्‍यातील नान्नज, कवडगाव, अरणगाव, पारेवाडी व म्हाळंगी येथील असल्याचे समजते. आरोपी अक्षय राऊत, चंद्रकांत राऊत, मोहन भोरे, ज्ञानेश्वर कोल्हे, गंगाधर जगताप अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. या पाचही आरोपींनी तुरुंगाच्या छताची कौले उचकटली. संधी साधून ते पळून गेले. 

कर्जत : येथील तुरुंगात गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेले पाच आरोपी पळून गेले. विशेष म्हणजे ही घटना सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास घडली. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानादेखील आरोपी पळून गेलेच कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

खुनाच्या गुन्ह्यात होते अटकेत
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार तुरुंगरक्षक जालिंदर माळ शिखरे हे तपासणी करीत चार नंबरच्या कोठडीत गेले होते. त्यावेळी त्यांना पाच आरोपी जेलमध्ये नसल्याचे दिसले. त्या कोठडीत एकूण नऊ आरोपी होते. पळून गेलेले आरोपी खून, बेकायदेशीर शस्त्र या सारख्या विविध गंभीर गुन्ह्यात अटकेत होते. 

जामखेड-कर्जतचेच आहेत आरोपी
पळून गेलेले आरोपीपैकी काहीजण हे जामखेड तालुक्‍यातील नान्नज, कवडगाव, अरणगाव, पारेवाडी व म्हाळंगी येथील असल्याचे समजते. आरोपी अक्षय राऊत, चंद्रकांत राऊत, मोहन भोरे, ज्ञानेश्वर कोल्हे, गंगाधर जगताप अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. या पाचही आरोपींनी तुरुंगाच्या छताची कौले उचकटली. संधी साधून ते पळून गेले. 

मी रजेवर आहे
या बाबत पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घडलेल्या प्रकाराला दुजोरा दिला. मी रजेवर आहे. मात्र, मी घटनास्थळी पोहोचत आहे. या प्रकाराची माहिती घेतो असे त्यांनी सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking: Five accused of Karjat jailed