अथणी : शेतात काम करून बैलगाडीने (Bullock Cart) परत घराकडे येताना अग्रणी नदीत बैलगाडी वाहून गेल्याने दोन मुले व एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना नांगनूर पी. ए. येथे मंगळवारी (ता. २७) सायंकाळी घडली. दोघांना वाचविण्यात यश आले आहे. दीपक संजू कांबळे (वय ८) आणि गणेश संजू कांबळे (वय ६) अशी मृत मुलांची नावे आहेत. संजय सदाशिव कांबळे आणि वेदांत संजय कांबळे यांना पाण्यातून वाचविण्यात यश आले.