Hingangaon Khurd burglary : हिंगणगाव खुर्द येथे घरफोडी; १ लाख ४६ हजारांचे सोन्याचे मणिमंगळसूत्र पळविले
Burglars Strike in Hingangav Khurd : चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आतील लोखंडी कपाटात ठेवलेल्या बॅगेतील १ लाख ४६ हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे मणिमंगळसूत्र लांबविले.
The scene of the burglary in Hingangav Khurd, where thieves stole a gold mangalsutra worth ₹1.46 lakh from the house.sakal
कडेगाव : हिंगणगाव खुर्द (ता. कडेगाव) येथे घरफोडीची घटना घडली असून, चोरट्यांनी १ लाख ४६ हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे मणिमंगळसूत्र पळविले. याबाबत प्रमोद हिंदुराव सावंत (रा. हिंगणगाव खुर्द) यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे.