हिरो व्हायच्या नादात सिओने केले कऱ्हा़डचे वाटोळे 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 March 2020

व्यापाऱ्यांची बाजू एेकूनच न घेणे ही हिटलरशाही पद्धत झाली. त्याला विरोध करून ती पद्धत मोडून काढून कऱ्हाड वाचवायचे आहे अशा बैठकीतील भावना हाेत्या..

कऱ्हाड ः हिरो व्हायच्या नादात सीओने जाता जाता कऱ्हाडचे वाटोळे करून करायचे ठरवून अतिक्रमण हटाव मोहिम राबवली आहे. त्या विरोधात पालिकेची नऊ मार्चला विशेष सभा घेण्यात येणार आहे.अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी केली. सिओनी अतिक्रमण विरोधी मोहिम राबविताना केलेल्या नुकसानीचा निषेध करून सिओनी कऱ्हाडकरांची माफी मागावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले..

अतिक्रमण हटाव मोहिमेत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांच्या बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रमोद तोडकर, रमेश मोहिते, नितीन ओसवाल, श्री. पोरवाल, श्री. ओसवाल यांच्यासह शहरातील बहुतांशी व्यापारी उपस्थीत होते. 

श्री. पावसकर म्हणाले, व्यापारी हा पहिल्यांदा कऱ्हाडचा नागरीक आहे. त्याचे नुकसान करण्याचा पालिकेला काय अधिकार आहे. मात्र तरिही ते केले गेले. चांगला अधिकारी म्हणून कौतुक केले. मात्र जाता जाता सिओनी त्यांचे खरे रूप दाखवत कऱ्हाडच्या बाजारपेठेचे नुकसान केले आहे. व्यापाऱ्यांनी एकत्रीत यावे. त्यांनी महासंघ स्थापन करावा. त्यांच्या प्रश्नांची चर्चा घडवावी. आत्ता अतिक्रमणामुळे आलेल्या संकटावर मात करता येवू शकते.. स्वच्छता अभियान किंवा अतिक्रमणाच्या नावाखाली कराडच्या नागरीकांचे नुकसान करणाऱ्यांना आम्ही सहन करणार नाही. प्रत्येक व्यापाऱ्यांनी एकत्रीत यावे. त्यांचे नुकसानीचा आकडा काढवा. आपण त्या विरोधात पालिकेला जाब विचारून नुकसान भरपाई मागू. ती न दिल्यास कोर्टात दाद मागू. अन्याय झाला आहे, त्या विरोधात आवाज उठवणार आहे. या विषयावर चर्चा करणार. दोषी अधिकाऱ्यांना जाब विचारणार.  त्यासाठी पालिकेची विशेष सभा घेणार आहे. त्या बैठकीत चर्चा घडवणार आहे. जी अतिक्रणाच्या बैठकीला येणार नाहीत. त्यांना जाब विचारा. व्यापाऱ्यांनी त्यांच्या प्रत्येक संघटनेला एकत्र बोलवा. त्यांची मानसिक तयारी करून घेवून एकी  करा. अन्याय सहन करून नका. एकत्रीत येवून जाब विचारा.

Video : ती बाेलवते पण आपण जायचे नाही

ते म्हणाले, सिओनी चांगल काम केले. त्यांंना आम्ही डोक्यावर घेतेले. आता त्यांनी कऱ्हाडचे वाटोळे केले आहे. त्याना आम्ही पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही. दुकानांचे बोर्ड बेकायदेशीर नाहीत. तरिही केलेले नुकसानाची भरपाई पालिकेने द्यावी. त्याला सिओ जबाबदार आहेत. अन्याय झाला आहे. त्याचा पंचनामा तर होणारच. ते कृत्य निषेधार्थ आहे. त्या विरोधात विशेष सभा घेण्याची सुचना नगराध्यक्षांना केली आहे. विशेष सभा घेण्याबाबत विरोधी व सत्ताधारी गटातील नगरसेवकांशी चर्चा केली आहे. तेही त्याला मान्यता देतील. बोर्ड पाडण्याचा अधिकार पालिकेला नाही. त्याला जाहीरात कराच्या शास्ती लागू करण्याचे अधिकार आहेत. दोन पोलिस चौक्या ज्या नागरीकाच्या सहभागातून उभा राहिल्या होत्या. त्याही पोलिसांदेखत पाडल्या गेल्या. पोलिस चौक्या संरक्षण होत्या. त्याही तोडल्या हे फार चुकीचे आहे. व्यापाऱ्यांच्या नुकसानीवर निश्चीत आंदोलन करावेच लागेल. ते केल्याशिवाय सिओला कळणार नाही की, लोकांचा रोष व राग किती आहे. व्यापाऱ्यांची बाजू  एकूणच न घेणे ही हिटलरशाही पद्धत झाली. त्याला विरोध करून ती पद्धत मोडून काढून कऱ्हाड वाचवायचे आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Businessmen Critices Chief Officer Karad For Removing Encrochment