बेळगाव : मार्केट स्टॉलसाठी २० रोजी लिलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cantonment Board Auctions for Renting Stalls in Beef Meat and Pork Market belgaum

बेळगाव : मार्केट स्टॉलसाठी २० रोजी लिलाव

बेळगाव : कॅण्टोन्मेंट बोर्डाने आपल्या हद्दीतील बीफ, मटण आणि पोर्क मार्केटमधील स्टॉल भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित केला आहे. एक वर्षाच्या मुदतीसाठी हा लिलाव असून २० जून रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे.थकबाकीदारांना लिलावात सहभागी होता येणार नाही. स्टॉल्स हस्तांतरित केल्यापासून एक वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर दिले जातील. लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आधार कार्ड/निवासी पुरावा आणि ओळखीचा पुरावा सादर करणे आवश्‍यक आहे. सुरक्षा ठेव प्रत्येक स्टॉलसाठी देऊ केलेल्या सर्वोच्च बोलीच्या मासिक शुल्काच्या तीनपट असेल.

लिलावावेळी कोणतीही बोलणी होणार नाही. जर बोर्ड बोलीवर समाधानी नसेल तर कोणतेही कारण न देता पुन्हा लिलाव केला जाईल. बीफ मार्केट मार्केटमधील १८ स्टॉलसाठी मूळ बोली २००० रुपये व ईएमडी ४ हजार, मटण मार्केटमधील १० स्टॉलसाठी मूळ बोली १,५०० रुपये व ईएमडी ३ हजार तर पोर्ट मार्केट १ स्टॉलसाठी मूळ बोली ३,५०० रुपये व ईएमडी ७ हजार रुपये असेल.

याचबरोबर २०२२-२३ या वर्षासाठी कॅण्टोन्मेंटमध्ये कोणताही व्यापार, व्यवसाय करु इच्छिणाऱ्या व्यक्तींना व्यापार परवाना आवश्यक आहे. यासाठी जाहिर नोटीस देण्यात आली आहे. इच्छुकांनी ई-छावणी पोर्टलवर १५० रुपये भरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. त्यानंतर व्यापार परवाना दिला जाईल. व्‍यापार परवाना न घेता व्‍यवसाय करणाऱ्यांवर कॅण्टोन्मेंट कायद्यानुसार पाच हजार रुपये दंड आकारला जाईल.

Web Title: Cantonment Board Auctions For Renting Stalls In Beef Meat And Pork Market Belgaum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top