बेळगाव : ‘कॅण्टोन्मेंट’ शाळेचे मैदान होणार स्मार्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cantonment board school grounds are getting smarter Beta Sports Club company from Pune is developing ground belgaum

बेळगाव : ‘कॅण्टोन्मेंट’ शाळेचे मैदान होणार स्मार्ट

बेळगाव - कॅण्टोन्मेंट बोर्ड शाळेचे मैदान स्मार्ट होत असून पुण्याच्या बिटा स्पोर्टस क्लब या खासगी कंपनीकडे या मैदानाच्या विकासाची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसात या मैदानाचे उद्घाटन होणार असून कॅण्टोन्मेंटच्या तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना या स्मार्ट मैदानाचा वापर करता येणार आहे. कंपनीने पावणेदोन कोटी रुपये खर्चून मैदानाचा विकास सुरु केला आहे. विद्यार्थ्यांना रोज सकाळी ८ ते दुपारी ३.३० पर्यंत शाळेच्या वेळेत या मैदानाचा वापर करता येणार आहे.

तर सायंकाळी पुण्याची कंपनी खेळात करियर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ठराविक शुल्क आकारुन प्रशिक्षण देणार आहे. कॅण्टोन्मेंट बोर्डात मराठी, इंग्रजी व उर्दू अशा तीन माध्यमांच्या शाळा आहेत. या तिन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १,५०० आहे. कॅण्टोन्मेंट बोर्ड शाळेचे मैदान २० वर्षांच्या करारावर सदर कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीकडून मैदानावर सुविधा निर्माण करणार असून त्या सुविधांच्या बदल्यात कंपनीला मैदानाचा वापर व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मोफत करण्याची मुभा देण्यात आली आहे. बिटा स्पोर्टस क्लब कंपनीचे प्रमुख रवी बिर्जे, कौत्सुभ बिर्जे व सौरभ बिर्जे यांच्या देखरेखेखाली हे मैदान तयार होत आहे.

कॅण्टोन्मेंट बोर्डाचे तत्कालिन सीईओ बर्चस्वा यांच्या कार्यकाळात कॅण्टोन्मेंट बोर्ड शाळेच्या मैदान विकासासाठी २० वर्षांच्या करारावर पुण्याच्या कंपनीला देण्यात आले आहे. तत्कालिन अध्यक्ष ब्रिगेडीअर रोहित चौधरी यांनी बोर्डाच्या बैठकीत याला मंजुरी दिली होती. कॅण्टोन्मेंट बोर्ड शाळेच्या यापूर्वीच्या मैदानावर फक्त माती होती. मात्र, आता या मैदानाचा कायापालट होत आहे. कॅण्टोन्मेंट शाळेत शिकणारे विद्यार्थी सामान्य कुटुंबातील असून त्यांना जागतिक दर्जाचे सुसज्ज मैदान उपलब्ध होणार आहे.

कॅण्टोन्मेंट शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळाची चांगली सोय व्हावी यासाठी हे मैदान बनविले आहे. सकाळच्या टप्प्यात शाळेचे विद्यार्थी मैदान वापरतील. सायंकाळी आमची कंपनी या मैदानात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देईल. अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडतील.

- रवी बिर्जे, बिटा स्पोर्टस क्लब, पुणे

Web Title: Cantonment Board School Grounds Are Getting Smarter Beta Sports Club Company From Pune Is Developing Ground Belgaum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top