नमाज पठण करणारे पाेलिसांनी घेतले ताब्यात; न्यायालयाने सुनावला दंड

नमाज पठण करणारे पाेलिसांनी घेतले ताब्यात; न्यायालयाने सुनावला दंड

कऱ्हाड : येथील मंगळवार पेठेत एकत्रीत नमाज पठण करणारे 23 जण पोलिसांनी आज (शुक्रवार) ताब्यात घेतले. या पेठेतील एका घरात नमाज पठण सुरू हाेते. त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकला.

पाेलिसांनी त्यातील 12 जणांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्वांना प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंड न भरल्यास 15 दिवसांची साधी कैदेची शिक्षा असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. उर्वरीत अल्पवयीन असल्याने त्यांना समज देवून सोडण्यात आले अशी माहिती पाेलिस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी दिली.

दरम्यान बुधवारी (ता.2) एक आवाहन करण्यात आले हाेते. त्यामध्ये आपल्या घरातच नमाज अदा करा. मशिदीमध्ये प्रशासनाने नेमून दिलेल्या तीन ते चार व्यक्तीच राहतील, अशी माहिती मुस्लिम समाजाचे सातारा जिल्ह्याचे तबलिक समाजाचे अमीर अनिस तांबोळी आणि कऱ्हाड विभागाचे मुस्लिम समाजाचे तबलीक समाजाचे अमीर युसूफ पटेल यांनी नुकतीच दिली हाेती. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासानाकडून प्रतिबंध नियम केले जात आहेत. त्यासगळ्याचे मुस्लिम समाज पालन करण्यास कटीबद्द राहील, अशीही ग्वाही त्यांनी दिली आहे.


12 हजार 500 घरांचा सर्व्हे पूर्ण

कऱ्हाड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने नागरी सुविधा आरोग्य केंद्राच्या मदतीने सुमारे 12 हजार 500 घरांचा सर्व्हे पूर्ण केला आहे. त्याद्वारे 60 हजार नागरिकांची तपासणी केल्याची माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली. 

पालिका घरोघरी जाऊन तपासणी करत आहे, असे सांगून मुख्याधिकारी श्री. डांगे म्हणाले, ""शहराचा हा सर्व्हे येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल. सध्याच्या झालेल्या सर्व्हेनुसार पुणे व मुंबईहून आलेल्या सुमारे 650, तर परदेशातून आलेल्या 33 लोकांची ओळख पटवली आहे. त्यांना होम क्वारंटाइन केले आहे. पुढचे चार ते पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. काळजी करण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे लोकांनी घरातच बसावे. त्यांना सर्व सुविधा घरपोच मिळतील. भाजीपाला, किराणा सेवा घरपोच पुरवली आहे. त्याशिवाय सगळ्या डॉक्‍टरांशी बोलून त्यांचे हॉस्पिटल अत्यावश्‍यक रुग्णांसाठी खुले केले आहेत. अत्यावश्‍यक रुग्णांनी येथे यावे. विनाकारण गर्दी टाळावी. शहरात 60 हजार लोकांची तपासणी केली आहे. त्यानुसार नागरी आरोग्य केंद्राचे पथक 12 हजार 500 घरांपर्यंत पोचले आहे. त्यांनी केलेल्या पाहणीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यावर उपाययोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Coronavirus : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या तीन; तांबव्यात हाय अलर्ट
 
शहरापासून आठ किलोमीटरवरील करवडी येथे जुने कॅन्सर हॉस्पिटल व एका कॉलेजात विलगीकरणाची सोय केली आहे. विलगीकरणासाठी रानडे हॉस्पिटलमध्ये 40 व कॉलजेमध्ये 20 बेडची सोय केली आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी पालिका व डॉक्‍टरांचे पथक तयार आहे. त्या ठिकाणी सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्याशिवाय तेथे जेवण, पाण्याची सोय केली आहे. भविष्यात जास्त रुग्ण आढळल्यास तरतूद म्हणून सर्व सुविधा तेथे दिल्या आहेत. त्यामुळे पालिका तत्पर आहे. मात्र, लोकांनी घरातून विनाकारण बाहेर न पडता कोरोनाचा मुकाबला करावा. पुढील पाच दिवसांत लोकांनी उत्स्फूर्त सहकार्य केल्यास आपण या संकटावर मात करू शकतो, असेही श्री. डांगे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com