Coronavirus : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या तीन; तांबव्यात हाय अलर्ट

Coronavirus : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या तीन; तांबव्यात हाय अलर्ट

कऱ्हाड : येथील एका रुग्णाचा अहवाल कोरोना बाधित आल्याचे गुरुवारी ता. 2 एप्रिल स्पष्ट झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. गावातील संबंधित संशयिताच्या कुटुंबीयांसह संबंधित व्यक्ती ज्यांच्या संपर्कात आली त्यापैकी काहींना आरोग्य विभागाने लगेचच तपासणीसाठी नेले. गावात प्रांताधिकारी, तहसीलदार, बीडीओ, पोलिस निरीक्षक, आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने भेट देऊन पुन्हा आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, गाव क्वारंटाइन करण्याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.
 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. जे पुण्या-मुंबईसह परदेशातून आले आहेत, त्यांची तपासणी सुरू आहे. त्यामध्ये मुंबईवरून आलेला एकाचा अहवाल कोरोना बाधित आला. संबंधित व्यक्ती 11 दिवसांपूर्वी मुंबईवरून गावात आली होती. कऱ्हाड तालुक्‍यात पहिलाच रुग्ण तांबव्यात सापडल्याने प्रशासनाकडूनही तातडीने दखल घेऊन गावातील यंत्रणा सतर्क करण्यात आली.

प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, सुपने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा हुंदरे गावात दाखल झाले. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सरपंच जावेद मुल्ला, उपसरपंच धनंजय ताटे, ग्रामविकास अधिकारी टी. एल. चव्हाण, तलाठी धराडे यांना गावात राबवण्याच्या उपाययोजनासंदर्भात सूचना केल्या. सध्या गाव क्वारंटाईन करण्याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
 

तपासणीसाठी लोकांनी पुढे यावे 

सातारा जिल्ह्यात यापुर्वी दाेन काेराेना बाधित रुग्ण हाेते. त्यावर उपचार सुरु आहेत. आता काेराेना बाधितांची संख्या तीनवर पाेचली आहे.
संबंधित व्यक्ती ज्यांच्या संपर्कात आली होती, त्यांनी स्वतःहून आवश्‍यक त्या आरोग्य तपासणीसाठी प्रशासन, आरोग्य विभागाला माहिती द्यावी. त्यामुळे संभाव्य बाधितांची संख्या आटोक्‍यात आणता येईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

  •  तांबव्यात पोलिस बंदोबस्तात वाढ 
  •  गावात येणारे सर्व रस्ते बंद 
  •  चार ठिकाणी नाकाबंदी 
  •  एकही जण अत्यावश्‍यक कारणाशिवाय बाहेर पडणार नाही 
  •  नियम तोडल्यास गुन्हे दाखल करणार 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com