विवाहितेच्या छळप्रकरणी पुण्यातील पाच जणांवर गुन्हा

विवाहितेच्या छळप्रकरणी पुण्यातील पाच जणांवर गुन्हा

सातारा : दुकानाकरिता दोन लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा मानसिक छळ केल्याप्रकरणी साताऱ्यातील पाच जणांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राहुलसिंग धनंजयसिंग परदेशी (वय 34), बिना धनंजयसिंग परदेशी (वय 58), केतन परदेशी सर्व (रा. 53, गणेश पेठ, पुणे) आणि वनमाला सुरेंद्र कौशिक (रा. नगर) जयश्री नितीन डाळवाले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनुराधा राहुलसिंग परदेशी (वय 30, मूळ रा. 53 गणेश पेठ, पुणे सध्या रा. दिव्यानगरी, सातारा) या विवाहितेचा एक जानेवारी 2016 ते 10 मार्च 2020 पर्यंत मानसिक, शारीरिक छळ केला. माहेरून दुकानाकरिता दोन लाखांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याचे तक्रार दिली. याप्रकरणी राहुलसिंग परदेशी, बिना परदेशी, केतन परदेशी आणि वनमाला सुरेंद्र कौशिक, जयश्री डाळवाले यांच्याविरोधात विवाहितेचा जाचहाट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सोन्याचे दागिने लंपास 

सातारा : येथील देशमुख कॉलनीतून चोरट्यांनी घरफोडी करून चार हजार 600 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 12 ते 13 मार्चच्या रात्री आठ वाजेपर्यंत देशमुख कॉलनी, सदरबझार येथील ज्योत्स्ना नीलेश जाधव (वय 31) यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला, तसेच घरातील चार हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

मूल होत नसल्याने त्यांनी दिले 21 लाख रुपये

आरफळ सोसायटीत 48 लाखांचा अपहार 

सातारा : आरफळ (ता. सातारा) येथील विकास सेवा सोसायटीत 2017-18 या कालावधीत लेखापरीक्षण करताना तत्कालीन सचिव, अध्यक्ष व संचालकांकडून 48 लाख 43 हजार 457 रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार लेखापरीक्षक विनोद मानसिंग साबळे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी 31 मार्च 2018 अखेर दप्तर तपासणीत बॅंक भरणा चलने बोगस असल्याचे आढळून आली आहेत. त्यामुळे सभासद कर्ज येणे बाकीत फरक दिसल्याने त्यांनी एकूण कर्ज व ताळेबंद बाकी यातील फरक शोधला. त्यामध्ये त्यांना हा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. 

हुंड्याच्या कारणावरून सासरच्या लोकांकडून छळाचा गुन्हा दाखल

फलटण शहर ः हुंड्याच्या कारणावरून सासरच्या लोकांकडून वेळोवेळी होत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासास कंटाळून कीटकनाशक प्राशन केलेल्या गिरवी येथील नवविवाहितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. पूजा सतीश कदम (वय 23) असे तिचे नाव आहे. या प्रकरणी सासरच्या तिघा जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
 
भरत दत्तात्रय निंबाळकर (वय 55 रा. लिंक रोड माधवनगर केडगाव ता. जि. नगर) यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी पूजा हिचा विवाह एक फेब्रुवारी रोजी फलटण येथे गिरवी येथील सतीश अरविंद कदम यांच्याबरोबर झाला होता. चार दिवसांपूर्वी मुलगी पूजा हिचा माझी पत्नी उमा हिचे फोनवर फोन आला, की मला माझे सासरी माझा नवरा सतीश कदम, सासरे अरविंद नानासाहेब कदम, सासू मंगल अरविंद कदम हे तुझ्या आईवडिलांनी लग्नात हुंडा, तसेच मानपान व्यवस्थित दिला नाही, म्हणून मला शिवीगाळ, दमदाटी करून शारीरिक व मानसिक त्रास देत आहेत. मला मारहाण करीत आहेत, तरी तुम्ही मला घेऊन जावा, असे सांगितल्यावर मी होळी व धूलिवंदनाचा सण झाल्यानंतर तुला घेऊन येतो, असे तिला सांगितले होते. 13 मार्च 2020 रोजी मला समजले, की मुलगी पूजा ही कीटकनाशक पिल्याने फलटण येथे दवाखान्यात आहे.

शिवसेनेच्या माजी खासदारांचे पुण्यात निधन

आम्ही फलटण येथे 14 रोजी दवाखान्यात गेल्यानंतर पूजा ही मृत झाल्याची दिसली. हा प्रकार तिने सासरच्या लोकांकडून वेळोवेळी होत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासास कंटाळूनच केल्याची व तिच्या मृत्यूस ते कारणीभूत ठरल्याची तक्रार निंबाळकर यांनी केल्याने पती, सासरे व सासू यांच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक उस्मान शेख करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com