पालिकेच्या कारवाईतून वाचविण्यासाठी 'त्यांनी' मागितले 80 लाख

पालिकेच्या कारवाईतून वाचविण्यासाठी 'त्यांनी' मागितले 80 लाख

महाबळेश्वर ः येथील एका गृहनिर्माण सोसायटीत विनापरवाना बांधलेल्या बंगल्यातील काही बांधकाम वाचविण्यासाठी तब्बल 80 लाखांच्या खंडणीची मागणी करणारे येथील संजय साळुंखे, हेमंत साळवी व इमरान मानकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
येथील सि.स.नं 210 मध्ये गृहनिर्माण सोसायटीमधील अनेक सदस्य स्थानिक आहेत, तर काही परगावचे धनिक आहेत. या सोसायटीमधील अल्पेश सागरमल शहा यांचा एक विनापरवाना बंगला आहे. हा बंगला पालिकेच्या कारवाईमधून वाचविण्यासाठी संजय साळुंखे, हेमंत साळवी व इमरान मानकर यांनी त्यास ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली, अशी तक्रार अल्पेश यांनी केली आहे. अल्पेश यांच्या म्हणण्यानुसार या तिघांनी अल्पेश शहा यांच्याकडे वेळोवेळी 80 लाखांच्या खंडणीची मागणी केली. परंतु, ही मागणी पूर्ण करण्यास अल्पेश यांनी नकार दिला. अनेक दिवस मागूनही खंडणीची रक्कम देत नाही, हे पाहून संजय साळुंखे याने त्यास तुझ्या विरोधात ऍट्रॉसिटीची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. या धमकीने अल्पेश घाबरल्याने खंडणीबहाद्दरांची पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. अल्पेश यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

खिंडवाडीत बंद घर फोडून लाखाच्या दागिन्यांची चोरी 

सातारा : खिंडवाडी (ता. सातारा) येथे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदी दागिने लंपास केले आहेत. याबाबत दिलीप विष्णू देवकर (वय 60, रा.खिंडवाडी, ता. सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी (ता.4) ते बाहेरगावी गेले होते. शनिवारी (ता. 7) ते परत आले. या दरम्यान चोरट्यांनी घराची खिडकी तोडून आत प्रवेश केला. त्यांनी आतील सोन्याचे दोन गंठण, बदाम, कर्णफुले, चांदीची मूर्ती व समई असा ऐवज लंपास केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

महिला नगराध्यक्षा धावून आल्या त्यांच्या मदतीला

मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा 

सातारा : दिलेले उसने पैसे परत देण्यास टाळाटाळ केल्याच्या कारणावरून एकाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महेश यदू खंडझोडे (रा. पाटखळ, ता.सातारा), सूरज पवार व सतीश (पूर्ण नाव माहीत नाही, दोघेही रा. सदरबझार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. धनाजी लालासाहेब पाटोळे (वय 26, रा. पाटखळ माथा, ता. सातारा) याने याबाबत फिर्याद दिली आहे. मंगळवारी (ता.10) रात्री अकराला वाढे फाटा येथील पुलाखाली त्यांनी दांडक्‍याने मारहाण करून शिवीगाळ केल्याचे त्याने फिर्यादीत म्हटले आहे. 

15 वर्षीय दिराला तिने सेक्स करण्यास भाग पाडले अन्यथा मी हे करीन....

आदर्कीत एकावर कुऱ्हाडीने वार 

सातारा : आदर्की (ता. फलटण) येथील एकावर त्याच्या मेव्हण्यासह दहा ते बारा जणांनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करत डोक्‍यात कुऱ्हाडीने वार केला आहे. मुकेश भोसले (रा.आदर्की बुद्रुक, ता.फलटण) असे जखमीचे नाव आहे. पिंपरे (ता.फलटण) येथे मेव्हणा घनशाम शिंदे व अन्य 10 ते 12 जणांनी मारहाण केल्याचे त्याने जिल्हा रुग्णालयातील पोलिसांना सांगितले आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Coronavirus : पाचगणीतील शाळांनी घेतला हा निर्णय 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com