Coronavirus : पाचगणीतील शाळांनी घेतला 'हा' निर्णय

Coronavirus : पाचगणीतील शाळांनी घेतला 'हा' निर्णय

भिलार (जि.सातारा) : कोरोना विषाणू संसर्गातून होणाऱ्या रोगाची कुणीही भीती बाळगू नका, काळजी हाच त्यावरील उपाय आहे. पाचगणीत असणाऱ्या शाळांनी याबाबत सतर्क राहणे गरजेचे असून, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सोशल मीडियावरील संदेशांची खातरजमा केल्याशिवाय ते पुढे फॉरवर्ड करू नका, असे तहसीलदार सुषमा पाटील यांनी सांगितले.
 
कोरोनाची व्याप्ती वाढत असताना याबाबत खबरदारी व सतर्कता असावी, रोगाचे गांभीर्य समजावे यासाठी आज तहसीलदार पाटील यांनी पाचगणीतील सर्व शाळांची नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला पाचगणीतील सुमारे 45 शाळांचे प्रतिनिधी, तसेच व्यापारी असोसिएशन, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, बेलएअरचे प्रतिनिधी व पालिका प्रशासनाचे प्रतिनिधी हजर होते.
 
पाचगणी हे जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र, तसेच जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने येथे निवासी शाळांची संख्या जास्त आहे. या शाळांमध्ये देशाबरोबरच परदेशातीलही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या मुलांना भेटायला येणाऱ्या पालकांची खबरदारी घेणे आपले कर्तव्य असून, आपण सर्वांनी सतर्क राहुयात, असेही तहसीलदार पाटील यांनी सांगितले. 
या रोगाबाबत कसल्याही अफवा पसरवू नका. सध्या परीक्षांचे दिवस असून, परदेशातून किंबहुना बाहेरील राज्यातूनही विद्यार्थ्यांचे पालक पाचगणीकडे येऊ नयेत, याची काळजी घ्यावी. आपल्या तालुक्‍यात कसलीही भीती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

वाचा : कोरोना भाग जा, भारत में थारो कैन काम काम रे; महिलांच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल

हेही वाचा : ...तर आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी चालतील

या बैठकीस निवासी नायब तहसीलदार श्रीकांत तिडके, कौस्तुभ भोकरे, पाचगणीचे मंडल अधिकारी विजय ढगे, तलाठी प्रशांत इंगवले, आरोग्य अधिकारी डॉ. शुभांगी डांगे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मेहुल पुरोहित, सुनील उंबरकर, भारत पुरोहित, राजेंद्र भगत, जयवंत भिलारे व इतर उपस्थित होते. 


शाळांना सुटी नाही 

पाचगणीतील शाळांत परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने कुठल्याही शाळेने सुटी दिली नाही. परीक्षांचा कालावधीं संपताच सर्व विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या घरी स्वतः पोचवणार आहोत, असे शाळांच्या प्रतिनिधींनी सांगितले. 

हेही वाचा : पोक्‍सो कायद्यानुसार महिलेवर गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com