पीडीओ ‘मला मराठी येत नाही, कन्नडमधून बोल’, असे परत सांगितले. यातून दोघांत वाद वाढला. यामुळे पत्तार यांनी आवाज चढवीत डुकरे याला कार्यालयामधून बाहेर जाण्यास सांगितल्याचा व्हिडिओ पुढे आला आहे.
बेळगाव : बेळगावसह सीमाभागात कानडी वरवंटा फिरविताना निष्पाप तरुणांना लक्ष्य केले जात आहे. किणये ग्रामपंचायतीमध्ये (Kinye Gram Panchayat) पाणी पुरवठ्यासह शासकीय सेवेबाबत विचारणा करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ टिपून त्याला भाषिक रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला आहे. यातून तरुणावर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी (Belgaum Rural Police) गुन्हा नोंदवीत (ता. १२) अटक केली आहे. तिप्पण्णा सुभाष डुकरे (वय २५, रा. किणये) असे त्याचे नाव आहे.