esakal | सावधान ः-तासगावचा मृत्यूदर वाढतोय 
sakal

बोलून बातमी शोधा

download (1).jpg

तासगाव (सांगली) ः शहरातील कोरोनामुळे होणारे वाढते मृत्यू तासगावकर नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना पॉझिटिव्ह 119 जणांपैकी 19 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्यूची वाढती टक्केवारी ही नागरिकांच्या बेजबाबदार पणामुळे ? की प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ? असा प्रश्‍न उपस्थित झाला असून प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे बनले आहे. 

सावधान ः-तासगावचा मृत्यूदर वाढतोय 

sakal_logo
By
रवींद्र माने

तासगाव (सांगली) ः शहरातील कोरोनामुळे होणारे वाढते मृत्यू तासगावकर नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना पॉझिटिव्ह 119 जणांपैकी 19 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्यूची वाढती टक्केवारी ही नागरिकांच्या बेजबाबदार पणामुळे ? की प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ? असा प्रश्‍न उपस्थित झाला असून प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे बनले आहे. 

तासगाव शहरात सध्या दररोज कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. पुणे, मुंबईहुन आलेल्यामुळे सुरुवात झाली आणि आता कोठेही परगावी न गेलेल्यांना सुद्धा कोरोना होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. तासगाव शहरात गेल्या तीन महिन्यात 24 ऑगस्टपर्यंत 119 रुग्ण सापडले असून त्यापैकी 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तासगाव शहरातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची टक्केवारी 19 टक्‍क्‍यांवर गेली आहे. सांगली महानगरपालिकेची टक्केवारी अवघी 3.42 टक्के आहे.

मग तासगावच्या वाढत्या मृत्यूला जबाबदार कोण? नागरिक दिवसेंदिवस बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. तोंडाला मास्क न लावणे, कोणतीही सोशल डिस्टनसिंगची काळजी न घेणे असे चित्र दिसत आहे. नुकत्याच रथोत्सव मिरवणुकीत तर सोशल डिस्टनसिंगचा पार फज्जा उडाल्याचे दिसत होते. ज्या भागात सर्वाधिक रुग्ण सापडले त्या भागात नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आलेले दिसत होते. विवाह आणि मयताला एकत्र येणाऱ्याची संख्या मोठी झाली आहे. 

शहरात अनेक दुकानांमध्ये मास्कचा विषय दूरच पण साधे हॅन्ड सॅनिटायझर ठेवण्याचे औचित्य ही दुकानदारांनी दाखवलेले दिसत नाही. कोरोना दूर ठेवण्यासाठी जे सोशल डिस्टनसिंग पाळणे आवश्‍यक आहे तेच नागरिक टाळताना दिसत आहेत. पालिका प्रशासन केवळ स्वछता आणि सॅनिटाईजर फवारणी यापुरते काम करताना दिसत आहे. कोविड हॉस्पिटल उभे करणे दूरच पण एखादी ×म्बुलन्सही भाड्याने घेणे पालिकेला जमलेले नाही. 
----- 

आतापर्यंतची स्थिती.... 
आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णामध्ये 72 पुरुष आणि 47 स्त्रियांचा समावेश आहे. सद्या 32 पुरुष 26 स्त्रियांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. मृत्यू पावलेल्या 19 जणांमध्ये 16 पुरुष आणि 3 स्त्रियांचा समावेश असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉ अनिल माळी यांनी दिली. 

संपादन ः अमोल गुरव 

loading image
go to top